आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धापरिक्षांसाठी सामान्यज्ञान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञान महत्त्वाचा भाग असतो. अशा विविध स्पर्धा परीक्षांत विचारलेले विषय व संबंधित प्रश्नांचा अभ्यास करणे उत्तम तयारीसाठी मदतीचे ठरू शकते. सन २०१४ मध्ये देशात अशा विविध प्रमुख परीक्षांत विचारण्यात आलेले अति महत्त्वाचे प्रश्न येथे देत आहोत. आगामी परीक्षांतही ते विचारले जाऊ शकतात.
भारतीय इतिहास
1. गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांनी कोणाच्या शासनकाळात आपल्या तत्त्वांचा प्रचार केला होता?
(आरआरसी ग्रुप-डी परीक्षा-14)
2. नालंदा विद्यापीठाचे संस्थापक कोण होते?
(बी.पी.एस.सी. प्रारंभिक परीक्षा-15)
3. १८८८ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाची अध्यक्ष राहिलेली ब्रिटिश व्यक्ती कोण?
(आरआरसी ग्रुप-डी परीक्षा-14)
4.सिकंदरने भारतावर आक्रमण केले वर्ष कोणते?
(दिल्ली पोलिस सेक्युरिटी कमांडो परीक्षा-14)
5. फत्तेपूर सिक्री कोणी वसवले होते?
(आरआरसी ग्रुप-डी परीक्षा-14)
विज्ञान
1. पेशींच्या केंद्रकाशिवाय इतर कोणत्या भागात डीएनए आढळून येतो?
(उत्तरप्रदेश पशुधन प्रसार अधिकारी परीक्षा-14)
2. व्हिटॅमिन-सीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
(उ.प्र. पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा-14)
3. सिनकोना वृक्षापासून कोणते औषध तयार केले जाते?
(उ.प्र. उच्च न्यायालय ग्रेड-डी परीक्षा-14)
4. आवर्त सारणीचे पहिले तत्त्व कोणते ?
(आरआरसी ग्रुप-डी परीक्षा-14)
5. कार्बोहायड्रेट पचनाचा अखेरचा उत्पादित घटक कोणता?
(उत्तरप्रदेश पशुधन प्रसार अधिकारी परीक्षा-14)
भूगोल
1. बेटांचा जगातील दुसरा मोठा समूह कोणता?
(दिल्ली पोलिस सेक्युरिटी कमांडो परीक्षा-14)
2. जपानच्या सहकार्याने सध्या पूर्णत्वास येत असलेला जायकवाडी जल विद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे?
(उ.प्र. उच्च न्यायालय ग्रुप-डी परीक्षा-14)
3. ग्रेट व्हिक्टोरिया डेझर्ट कोणत्या देशात आहे?
(आरआरसी ग्रुप-डी परीक्षा-14)
4. गेल स्कूलच्या अहवालानुसार पृथ्वीवरील वाळवंटांचे प्रमाण गेल्या १२५ वर्षांत किती प्रमाणात वाढले आहे?
(दिल्ली पोलिस सेक्युरिटी कमांडो परीक्षा-14)
5. फुलांच्या खोऱ्यात कोणती नदी वाहते?
(उत्तराखंड पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा-14)
क्रीडा
1. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा -२०१४ मध्ये भारताच्या कोणत्या भारोत्तोलकाने विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जिंकले?
(उ.प्र. उच्च न्यायालय ग्रेड-डी परीक्षा-14)
2. पोलो क्रीडा प्रकारात प्रत्येक संघात खेळाडूंची संख्या किती?
(आरआरसी ग्रुप-डी परीक्षा-14)
3. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्यपदक जिंकणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण?
(दिल्ली पोलिस सेक्युरिटी कमांडो परीक्षा-14)
4. १७ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या?
(उत्तराखंड पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा-14)
5. थॉमस कप-2014 तील विजयी देश कोणता?
(उ.प्र. उच्च न्यायालय ग्रेड-डी परीक्षा-14)
बातम्या आणखी आहेत...