आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॉसिप- 50 टक्के भिकारी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट काढला, मालिका काढली म्हणजे आपण मराठी भाषा जपून सरकारवर उपकारच करतो, या थाटात गोरेगाव चित्रनगरीत 50 टक्के सवलत मिळावी म्हणून मराठीतले 50 टक्के भिकारी एकत्र आले. मराठीची अवस्था ‘लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार’ अशी झाली आहे.
‘सरकारी अनु‘दान’ तरी दुबळी माझी झोळी’ असा ओरडा करत सध्या मराठी फिल्म इंडस्ट्री आणि मराठी मालिकावाले फिरताना दिसतात. मराठी मालिकांचा उंच झोका जमिनीवर आणण्याचा प्रयत्न झाला आणि म-हाटी ‘बाणा’चे धनुष्य आणि इंजिन त्या झोक्यावर स्वार झाले. राज्यात पाणी प्रश्न, गरिबी, दुष्काळ अशा छोट्या-मोठ्या प्रश्नांवर चर्चा तर रोजचीच झाली. त्यामुळे मराठी मालिकांच्या चित्रीकरणाचे ‘योग्य’ भाडे घेऊ लागल्यावर महाराष्ट्राच्या अस्तित्वावरच घाला घातल्याच्या आविर्भावात मोर्चे आणि चर्चासत्रे घडली. त्यामुळे ‘मराठी’पणा म्हणजे सवलत, असे करेक्शन मराठीच्या शालेय पुस्तकात केले गेले तरी वावगे ठरणार नाही. चित्रपट काढला, मालिका काढली म्हणजे आपण मराठी भाषा जपून सरकारवर उपकारच करतो, या थाटात गोरेगाव चित्रनगरीत 50 टक्के सवलत मिळावी म्हणून मराठीतले 50 टक्के भिकारी एकत्र आले. सरकारने कुरवाळलेले जनावर आता चावायला लागलेय, तेव्हा तात्पुरते इंजेक्शन म्हणून गोरेगाव चित्रनगरीत एका वर्षासाठी एका मालिकेचे चित्रीकरण करायला 50 टक्के सवलत देण्यावर सध्या सरकारचा विचारविनिमय सुरू आहे. दुस वर्षी जर मालिका लांबली तर चित्रनगरीचे पूर्ण भाडे निर्मात्याला भरावे लागेल. यातून एक चांगली गोष्ट घडू शकते. मराठी (रटाळ) मालिकांची वयोमर्यादा एक वर्ष राहील आणि प्रेक्षकांची सुटका होईल. मात्र, या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे आता 50 टक्के सवलत मिळतेय म्हणून दरवर्षी नवीन मालिका घेऊन येणारे ‘सो कॉल्ड गरीब’ निर्माते तय्यार... चित्रपटाच्या पुरस्कारांसाठी निधी द्या, चित्रपटाला अनुदान द्या, मालिकेसाठी सवलत द्या... राज्य सरकारच्या तिजोरीतली माया या मराठीचे जतन, संवर्धन करणांच्या झोळीत ओतली जाते आणि ती झोळी फाटेस्तोवर ‘द्या द्या’चा धोशा चालूच आहे. यात मराठीची अवस्था ‘लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार...’ अशीच झाली आहे.