आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायांच्या रक्तवाहिन्यांमधील गुठळ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीप व्हेन थोम्बॉसिसफ (DVT) हा नेहमी आढळणारा आजार आहे. यामध्ये पायाच्या मुख्य अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ अचानक तयार होते. पायाच्या तळव्यापासून तर मांडीपर्यंत सूज येते. पाय दुखायला लागून त्याचे वजन वाढते. या अशुद्ध रक्तवाहिन्या, रिवियल, पॉप्लिरियल व फिसोरल व आयसियाक व्हेन्स असून, त्यामध्ये गाठी तयार होण्याची अनेक कारणे असतात.


पायाचे फ्रॅक्चर, दीर्घ आजार, लांब पल्ल्याचा विमानप्रवास, अतिलठ्ठपणा, रक्तदोष आदी कारणे :
मुख्य कारण म्हणजे रुग्णाचे बराच काळ पायाचे फ्रॅक्चर किंवा उतारवयातील दीर्घ आजार, दीर्घकाळ पायाची हालचाल न करता बसून राहणे (उदाहरणार्थ लांब पल्ल्याचा विमान प्रवास) तसेच अति लठ्ठपणा व कॅन्सर, गर्भनिरोधक वा मायग्रेनच्या गोळ्या व रक्तातील इतर दोष. (उदा. अँटिथ्रोम्बिन) प्लॉस्मिनोजनची कमतरता किंवा अँटी फॉस्फोलिपीड अँटिबॉडीज) यामुळे देखील हा आजार होऊ शकतो.


आजाराची लक्षणे :
पायाला तळपायापासून वरपर्यंत सूज येणे तसेच पायाचे तापमान वाढून तो दुखतो. त्याचे निदान हे व्हिमस डॉप्लरने होते. डीप्टीटी या आजाराचा मुख्य धोका रक्तवाहिनीतील गाठ फु्प्फुसातील रक्तवाहिनीत जाणे (पल्सनरी एम्बोलिझम) हा अतिशय घातक आजार असून त्यामध्ये रुग्णाचा रक्तदाब कमी होऊन जीव कासावीस होतो. हृदयाचे ठोके जास्त होऊन दम लागतो. योग्यवेळी उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. पायांच्या मोठ्या हाडांच्या फ्रॅक्चरमध्येदेखील त्यातील फॅट एम्बोलिझम होऊ शकते.


हे आहेत उपचार....
पायाला बँडेज बांधून उंच करणे व रक्त पातळ व्हायची औषधी अ‍ॅस्पिरिन, क्लोपेडीग्रेल, हिपॅरीन व नंतर सहा महिने ते 2 वर्षे वॉरफॅरीन ही गोळी चालू ठेवावी लागते. पल्सनरी एम्बोलिझमची त्वरित ट्रिटमेंट आवश्यक आहे. त्यामध्ये फुप्फुसाच्या रक्तवाहिनी (पल्सनरी आर्टरी)मध्ये कॅथेटर टाकून स्ट्रप्लास्कायनेस, युरोकायनेस किंवा टीपीए अशी औषधे देऊन गाठ वितळविता येते, इतर उपचार प्रणालीपेक्षा जास्त फायदा होतो. ही उपचारप्रणाली कॅथलॅबमध्ये करता येते.


अशी घ्या काळजी :
एम्बोलिझम होऊ नये म्हणून पायाच्या किंवा मानेच्या अशुद्ध रक्तवाहिनीमधून फिल्टर टाकता येते. हे फिल्टर गाळणीचे काम करते व पायातील मोठी गाठ फुप्फुसात जाऊ देण्यास मज्जाव करते व एम्बोलिझमची शक्यता कमी होते. मोठ्या शस्त्रक्रियेनंतर तळपायाची एकसारखी हालचाल करणे, पायांना इलॅस्टिक स्टॉकिन्स घालावी, रक्त पातळ व्हायची औषधी यामुळे डीव्हीटी किंवा पल्सनरी एम्बोलिझमला अटकाव होऊ शकतो.