आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Forensic Sciences University, Special Syllabus

गुजरात फोरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीचे विशेष अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरात फोरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, गांधीनगर येथे उपलब्ध असणार्‍या विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

> एमएस - फोरेन्सिक फार्मसी : अर्जदारांनी बीफार्म पदवी उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय जीएटीई/ जीपीएटी यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

> एमएस - फोरेन्सिक नॅनो टेक्नॉलॉजी : अर्जदारांनी विज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी वा फार्मसीमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

> एन्व्हायर्नमेंटल सायन्स : अर्जदारांनी विज्ञान, सिव्हिल, केमिकल अथवा एन्व्हायर्नमेंटल सायन्स यासारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

> एमएस - रसायनशास्त्र : अर्जदारांनी रसायनशास्त्रासह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

> एमएस - एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट : अर्जदारांनी विज्ञान, सिव्हिल इंजिनिअरिंग, एन्व्हायर्नमेंटल, इंजिनिअरिंग यासारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

> विशेष सूचना : वर नमूद केल्याप्रमाणे असणार्‍या प्रवेश पात्र परीक्षेतील अर्जदारांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी 55% असायला हवी. याशिवाय जे विद्यार्थी वरील पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करण्यास पात्र आहेत.

> एमटेक - सिव्हिल इंजिनिअरिंग : अर्जदारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील बीई/बीटेक पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

> अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून 1000 रु. भरणे आवश्यक आहे.

> अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी गुजरात फोरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या दूरध्वनी क्र. 079-65735502 वर संपर्क साधावा अथवा युनिव्हर्सिटीच्या www.gfsu.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

> पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज रजिस्ट्रार, गुजरात फोरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, सेक्टर-18/ए, डीएफएस कॅम्पस, पोलिस भवन जवळ, गांधीनगर (गुजरात) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 14 जून 2014.