Home | Magazine | Madhurima | happiness-in-simplicity

साधेपणातच खरा आनंद

जयश्री डकले, औरंगाबाद | Update - Jun 10, 2011, 02:46 PM IST

पती-पत्नीमध्ये विश्वास, समजून घेण्याची वृत्ती असेल तर लग्नानंतरचा एकेक दिवस आठवणीत राहण्यासारखा होतो. ..

  • happiness-in-simplicity

    वाढदिवस साजरा करण्याची पद्धत जुनी असो अथवा नवीन; वाढदिवस साजरा करण्याची मनापासूनची इच्छा आणि त्यादृष्टीने केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. होणारे सेलिब्रेशन सर्वांच्या मनापासून असेल तर साध्या-साध्या गोष्टीतही आनंद वाटतो. वाढदिवस अविस्मरणीय होतो.
    लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. पती-पत्नीचा एकमेकांवरील विश्वास, प्रेम आणि आदर यावरच तर संसाराचा गाडा सुरू असतो. या गाड्याची दोन्ही चाके मजबूत असतील तर जीवनात येणाºया प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती आपोआप निर्माण होते. आमच्या लग्नाचा ३३वा वाढदिवस नुकताच आम्ही साजरा केला; परंतु लग्नानंतर सासरी झालेला माझा पहिला वाढदिवस आजही माझ्या स्मरणात आहे. सासरी येणाºया पहिल्या वाढदिवसाची उत्सुकता काही वेगळीच असते. माझा विवाह २८ एप्रिल १९७७ रोजी झाला. लग्न झाल्यावर वधूसाठी नवीन घर कसे असेल, त्या घरातील माणसे कशी असतील असे नाना प्रश्न माझ्या मनात घर करून बसले होते. माझ्या लग्नानंतर काही दिवस मी गावाकडे राहिले. त्यानंतर पतीच्या बदलीच्या ठिकाणी आम्हाला राहावे लागले. पती-पत्नीमध्ये विश्वास, समजून घेण्याची वृत्ती असेल तर लग्नानंतरचा एकेक दिवस आठवणीत राहण्यासारखा होतो. लग्नानंतरचा सासरी झालेला माझा पहिला वाढदिवस हा कायम स्मरणात राहणारा आहे.
    मुळात खेडेगावात सर्व बालपण गेले. लग्नही खेडेगावतच झाले, त्यामुळे तिथे शहरातल्या सारखा वाढदिवस साजरा करणे, भेटवस्तू देणे अशासारखे प्रकार पूर्वीच्या काळी होत नसत. त्यामुळे आपल्या बाबतीत सासरी वाढदिवस वगैरे साजरा होईल, अशी अपेक्षा करणेही चूक होते. साधेपणाने राहण्यातच आनंद मानणारी माझी सासरची मंडळी. त्यामुळे त्यांनी बाकी काही करण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी सकाळी सासू-सासºयांना नमस्कार केला. सासूबार्इंनी औक्षण करून आशीर्वाद दिला. त्यानंतर मी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करू लागले. स्वयंपाक झाल्यानंतर ‘यांनी’ सांगितले की, आपल्याला बाहेर जायचे आहे. मला आश्चर्य वाटले अन् थोडी भीतीही. सासूबाई काय म्हणतील याची भीती. पण जेव्हा सासूबार्इंनीही हसून परवानगी दिली तेव्हा मला जरा आश्चर्यच वाटले. त्यानंतर आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा यांनी मला थिएटरसमोर आणून उभे केले. आम्ही त्या दिवशी चित्रपट पाहिला आणि दुपारचे जेवण बाहेर केले. रात्रीचे जेवण कुटुंबाबरोबर केले. त्यामुळे एकमेकांची जवळीक वाढली. लग्न आणि लग्नानंतरच माझा पहिला वाढदिवस हा माझ्या जीवनात नेहमीच स्मरणात राहील.

Trending