आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदायी फळे: आंबा, जाणून घ्या कसे पडले नाव अल्फान्सो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंब्याचा एप्रिल-जून हा मोसम आहे. सागरी हवामानात येणारे हे फळ पाहता याचा उगम ह्याच म्हणजे आशियात कोकणात झाला आहे. भारतीय संस्कृतीत आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक कार्यक्रमात वापरण्यात येतात. भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, मलगोबा, नीलम, फर्नांडिस, रायवळ, गोटी इ. जाती आढळतात. आंब्यात हापूसच्या एक जातीला अल्फान्सो असेही नाव दिले आहे. तत्कालीन (४०० वर्षांपूर्वी) गोव्याचे पोर्तुगीज गव्हर्नर अल्फान्सो यांचेच नाव पोर्तुगीजांनी हे हापूस आंबे लिस्नेनला पाठवताना दिले.

आंब्याच्या मोहोराला अनेक आंबा बीज असते, पण वादळात हे बीज बरेचसे गळून पडते. साधारणत: दहा ते वीस टक्केच आंबा पाडाला (पिकायला) येतो. कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यास आंब्याचा माच लावणे असे म्हणतात. आंब्याच्या साली सत्वयुक्त असतात जनावरे ती आवडीने खातात. बिया म्हणजे कोय सुध्दा बहुपयोगी असते. मोहोर आल्यावर पाच महिन्यांत फळ पिकते. फळांचा आकार व स्वाद रंग वगैरे गुण प्रकाराप्रमाणे निरनिराळे असतात. सालीने वेढलेल्या फळात रसाळ गर आसतो. काही फळांमधील गर तंतुमय असतो गरात अ व क जीवनसत्वे असतात. कच्च्या फळांना कैरी म्हणतात. कैरी आंबट, पाचक व शीतल तर पक्व फळे (आंबा) गोड, सारक असतात. कच्ची फळे लोणची, मुरंबे, पन्हे व आमचूर यांकरिता तर पिकलेली फळे खाण्यास आंबापोळी आणी मिठाईसाठी उपयुक्त असतात. झाडाच्या खोडाच्या सालीतील टॅनिनमुळे ती कातडी कमविण्यास आणि रेशीम, सूत व लोकर रंगविण्यास वापरतात. आंब्याचे लाकूड बांधकाम, शेतीची अवजारे आणि खोकी तयार करण्यासीठीही वापरतात. उपयोगीता व चवीमुळे कोरड्या हवामानातील या फळाला उष्ण प्रदेशातील फळांचा राजा म्हणतात. गरमी परमा उपदंशा सिफिलीस अशा समस्यांवरती तर आंब्याच्या कोवळ्या पानांचा रस निश्चित घ्यावा. रोग लवकर बरा होतो. नेत्ररोगाच्या विविध समस्यांकरिता आपण ऊठसूठ नेत्रतज्ज्ञांकडे जातो. आंब्याची ताजी पाने चार कप पाण्यात उकळावीत ते पाणी आटवून एक कप करावे. स्वच्छ फिल्टर पेपरने गाळावे. गार झाल्यावर बाटलीत भरावे. असे पाणी नेत्रबिंदू (ड्रॉप्स म्हणून वापरावे) डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांतून वारंवार पाणी येणे, धूसर दिसणे, वाचनामुळे डोळे थकणे, रांजणवाडी या विकारांवर या थेंबांमुळे आराम मिळतो.

विंचू, झुरळ, मुंग्या, डास अशा कीटकांच्या चावण्यामुळे त्वचाविकार होतात अशा वेळेस आंब्याच्या मोहोर किंवा ताजी कोवळी पाने स्वच्छ धुवून लगेचच वाटून त्याचा लेप लावावा. काही तासांतच आराम मिुळतो. पोटातील कृमींवर आंब्याच्या कोयींचे चूर्ण जालीम औषध आहे. अंडवृध्दी ही पुरुषांना भेडसावणारी समस्या आहे. यावरसुध्दा आंब्याच्या कोयीचे चूर्ण हा उत्तम उपाय आहे. मुरगळणे, लचकणे, सूज येणे या समस्येवर आंब्याच्या कोयीचे चूर्ण दाट लेप करुन लावावे.
बातम्या आणखी आहेत...