आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळख आरोग्यावरील पुस्तकाची : आपला आहार आपले औषध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आरोग्य रक्षणासाठी कच्च्या आहाराचा गुरुमंत्र
पुस्तकाचे नाव - आपला आहार आपले औषध
लेखिका - आशा भांड
प्रकाशन - साकेत प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठसंख्या - 48, मूल्य - 30 रुपये
आरोग्यदायी फळ आणि फळभाज्यांच सुंदर मुखपृष्ठ असलेल छोटेखानी टिपवजा पुस्तक वाचायला कंटाळ न येणार अस आहे. त्यात सुंदर सुंदर सरळ सोप्या अशा रेखाचित्रामुळे समजायला विषय सोपे जाते. लेखिकेचे छोटेसे एक पानभराचे मनोगत व त्यानंतर सुरू होतो आपला आरोग्यवाचन प्रवास. शरीराचे इंधन अन्न आहे. हवा-पाणी आहे. अन्नातून ऊर्जा मिळते. शंभर वर्षे शरीराची क्षमता आहे. यंत्र नीट चालावे म्हणून योग्य इंधन लागते तसेच त्याची देखभाल, दुरुस्ती करावी लागते. चुकीचे इंधन वापरले की यंत्र बिघडते. चुकीचा आहार घेतला की शरीरात बिघाड होतो. बिघाड म्हणजे आजारी पडणे.
योग्य आहार घेतल्यास आजार होत नाहीत. म्हणजे आपला आहार हेच आपले औषध आहे. तळलेले, खूप शिजवलेले आणि मसाल्याच्या पदार्थाने शरीरास अपायच होतो. मांसाहार, कांदा, लसूण, मिरची, वांगी, चहा, कॉफी, सिगारेट आणि तंबाखूने शरिराची हानी होते. शाकाहार, कच्च्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि फळे हा खरा अमृत आहार आहे. आणि हेच आपले उत्तम औषधही आहे. हेच सांगण्याचा पटवून देण्याचा सहज सोप्या भाषेत त्यांनी आठ प्रकरणात केला आहे. ती प्रकरणे पुढीलप्रमाणे आहेत. -विश्वाची मिर्मिती आणि निसर्गनियम, -आहार, - कच्चे अन्न हा अमृत आहार, - आपला आहार हेच आपले औषध आहे, - काही गुणकारी रस आणि त्यांचा उपयोग, -काही आजार आणि त्यांवर रसांचा उपचार, -गुणकारी पेये आणि सूप, -काही आरोग्यदायी पदार्थ.
आपल्या मनोगतात लेखिका आशा भांड म्हणतात, की निरोगी राहायचे असेल तर प्रत्येकाने नैसर्गिक साधा शाकाहार, कच्च्या फळभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये खाल्ली पाहिजेत याचे शास्त्रशुद्ध शिक्षण सिद्ध समाधी योगाच्या वर्गातून दिले जात आहे. याचा अनुभव मी स्वत: अनेक वर्षे घेत आहे. या आहाराचा फायदा हा वर्ग केलेले अनेक साधक घेत आहेत.