आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य शिक्षण गरजेचे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्यविषयक शिक्षण म्हणजे आरोग्य शिक्षण म्हणता येईल. तसे पाहू जाता आरोग्य शिक्षणाच्या अनेक व्याख्या आहेत. आरोग्यपूर्ण जीवन जगता येण्यासाठी लोकांना चांगल्या सवयींची, वर्तनाची माहिती देऊन तसे वागण्यास त्यांना उद्युक्त करणे, प्रोत्साहित करणे, गरजेनुसार त्यासाठी प्रशिक्षण देणे, पर्यावरणातील बदल घडवणे, या सर्व प्रक्रियेला आरोग्य शिक्षण म्हटले जाते. आरोग्य शिक्षणाचा उद्देश लोकांना आरोग्याबाबत जागरूक करणे आणि त्यांच्यात आरोग्यपूर्ण वर्तन, सवयी रुजवणे हाच असतो. अज्ञानात आनंद असे आपण म्हणतो, पण आरोग्याच्या बाबतीत मात्र अज्ञानामुळे अंधार असेच म्हणावे लागेल. रोग का होतात? त्यावर कोणते उपचार आहेत? ते कसे संक्रमित होतात? रोगाचा प्रतिबंध कसा करावा? त्याचबरोबर निरोगी राहण्यासाठी काय करावे? कोणता व्यायाम करावा, कोणता आहार घ्यावा? या सर्व बाबींचा आरोग्य शिक्षणात समावेश होतो. व्यक्तीचे वय, लिंग, शारीरिक स्थिती, रोग आदी बघून मग त्यानुसार सुयोग्य आरोग्य शिक्षण द्यावयास हवे. आरोग्य शिक्षणाचे महत्त्व एड्समुळे आपल्या लक्षात येईल. एड्स प्रतिबंधासाठी लस नाही. शंभर टक्के खात्रीशीर इलाज नाही. म्हणून एड्सचा प्रतिबंध हाच त्यावरचा प्रभावी उपचार ठरतो.