आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदायी फळ: गाजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रीय नाव : ड्युकस कॅरोटा
हिवाळ्याच्या दिवसांत गाजर भरपूर उपलब्ध होतात. ती खाल्ली पाहिजेत. त्याचे भरपूर फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे :
{मुख्यत: गाजराचे मूळ व बीज औषधांमध्ये उपयोगात घेतले जाते. गाजर खाल्ल्याने भूक वाढते. पोट साफ न होणे, मूळव्याध, आयबीएससारख्या आजारांमध्ये गाजर खाणे फायदेशीर आहे.
{ गाजर खाल्ल्याने शरीरातील सप्तधातूंचे विशेषत: शुक्रधातूचे पोषण होते. त्यामुळे ज्या पुरुषांना मैथुनसंबंधी तक्रारी असतात त्यांना गाजर खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
{ रक्तपित्त व्याधींमध्ये (घोळाणा फुटणे, मल किंवा मूत्राद्वारे रक्त पडणे) गाजराचा हलवा खाल्ल्यास फायदा होतो.
{ बुद्धी, स्मृती वाढविण्यासाठी गाजर फायदेशीर आहे.
{ ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये स्राव कमी होतो. त्यांनी गाजर नियमितपणे खाण्यामध्ये वापरल्यास स्राव व मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.
{ मूतखड्यामध्ये गाजर उपयुक्त आहे.
{ शारीरिक तसेच मानसिक दौर्बल्यामध्ये गाजराचा हलवा खाल्ल्यास अत्यंत उत्तम फायदा होतो.