आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदायी फळे: चिकू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यातील चिकू खाण्याचे फायदे
>चिकू गोड, थंड भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे. उन्हाळ्यात याचे दररोज सेवन केल्यास आरोग्यदायी लाभ होतात. चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकारचा उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो. चिकूची साल तापनाशक आहे. चिकूच्या सालीमध्ये टॅनिन असते. आतड्यांसाठी चिकूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. चिकूच्या बियांमध्ये सापोनीन आणि संपोटिनीन नावाचा कडवट घटक असतो.
> चिकूमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची शक्ती वाढते. चिकूमध्ये ग्लुकोजची मात्राही चांगली असते. जे लोक जास्त काम करतात त्यांना ऊर्जेची जास्त आवश्यता असते. अशा लोकांनी चिकूचे नियमित सेवन करावे.
> चिकूमधील पॉलिफेनॉलिक या घटकामुळे मूळव्याध, अन्ननलिका दाह, जुलाब अशा आजारात आराम मिळताे.
> चिकूमध्ये ७१ टक्के पाणी. १.५ टक्के प्रोटीन आणि २५.५ टक्के कार्बोहायड्रेट असते. यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात तर व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते. या फळामध्ये १४ टक्के शर्करा असते तसेच यामध्ये फॉस्फरस आणि लोह असते.
> हाडांसाठी चिकू खूप फायदेशीर आहे. चिकूमध्ये फॉस्फरस आणि आयर्नचे अतिरिक्त प्रमाण असते, जे हाडांसाठी खूप आवश्यक आहे. कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरसची चांगली मात्रा असल्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी चिकू लाभदायक आहे.
> शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यामध्ये अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुण पॉलिफेनॉलिक अँटीऑक्सिडन्ट घटक आहे. यामधील अँटीऑक्सिडन्ट घटक शरीरातील विषाणूंना नष्ट करतात. पोटॅशियम, आयर्न, फॉलेट, आणि नियासिन हे घटक पचनक्रियेला स्वस्थ ठेवतात.
> चिकूमध्ये व्हिटॅमिन ई आढळते जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे तुमची त्वचा स्वस्थ आणि सुंदर होईल. चिकूच्या बियांचे तेल केस वाढीसाठी फायदेशीर ठरते.
> चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. चिकूच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते.
> कफाचा त्रास असेल तर चिकूचे सेवन फायदेशीर ठरते. चिकूमध्ये खास तत्त्व आढळतात जे श्वसन मार्गातील अडथळे दूर करतात आणि खोकल्यापासून आराम मिळतो. सर्दीमध्येही चिकू प्रभावी उपाय आहे.
> मानसिक स्वास्थ्य आणि डोकं शांत ठेवण्यासाठी चिकू उपयुक्त फळ आहे.
यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. अनिद्रा, चिंता आणि तणाव पीडित लोकांनी चिकूचे नियमित सेवनाने आराम मिळतो.
> चिकूमध्ये जास्त प्रमाणत फायबर आढळते. गर्भावस्थेमध्ये लाभदायक कार्बोहायड्रेट आणि पोषक तत्त्वांची चांगली मात्रा प्राप्त करण्यासाठी चिकू लाभदायक आहे. प्रसूतीनंतर अंगावर जास्त प्रमाणात दूध येण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे.
बातम्या आणखी आहेत...