आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही गुरुजी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभंगाच्या रचनेत एका प्राथमिक शिक्षकाने शिक्षकांचे दुखणे मांडले आहे. शिक्षकांची सातत्याने तक्रारही अशैक्षणिक कामांविषयी असते. पण एखादी तक्रार पुन्हा पुन्हा मांडून झाली की मग विडंबनाचा वक्रोक्तीचा आ करू नका...

कवी म्हणतो शिक्षण कायदा आल्याने आम्ही देखावा उभा करू पण गुणवत्ता सोडून आम्ही सगळे देऊ. एकाच वेळी ही टीका सरकार अधिकारी यांच्या देखाव्याला व शिक्षकांच्या मानसिकतेचे ही वर्णन करते. शिक्षण कायद्याची जाहिरात झाली. प्रशिक्षणे झाली, पण मानसिकता तीच राहिली. तेव्हा वरपासून खालच्या शिक्षकांपर्यंत सारेजण फक्त देखावा करत राहिले आणि शिक्षणात गुणवत्ता आलीच नाही. असर अहवालात दरवर्षी 50 टक्के मुले वाचत नाहीत हेच वाचावे लागले.

त्यानंतर कवी शिक्षकांना जी कागदी कामे करावी लागतात ते सांगतो. अभिलेखे ठेवावी लागतात.

एक विस्तार अधिकार्‍याने संशोधन करून किमान 22 टक्के वेळ या कामात जातो असे मांडले आहे. अधिकारी फक्त मिटिंगा-मिटिंगा आणि मिटिंगाच घेत राहतात. त्यातून पुन्हा नवे नवे कागद निर्माण होतात. याची कवी खिल्ली उडवतो.

बांधकामांमुळे अनेक शिक्षकांनी राज्यात आत्महत्या केल्या. पण तरीही हे काम शिक्षकांकडून काढले जात नाही. बांधकाम विभाग ते काम चांगले करणार नाही व शिक्षक मात्र इमानदारीने करतील म्हणून त्यांच्या गळ्यात हे काम टाकले आहे. शालेय पोषण आहारात वेळ जातो. जोखीम असते पण शिक्षकाकडून हे काम काढले जात नाही. पुन्हा विविध सर्वेक्षणेही करावीच लागतात. खेड्यात काम करताना गावकरी सरपंच पालक यांना सांभाळावे लागते. ते केले नाही तर गुरुजींविरुद्ध तक्रारी सुरू होतात. हे सारे शिक्षकाचे रोजचे भागधेय तिरकसपणे कवी मांडतो आहे. त्यातील वेदनामात्र लपत नाही.

तरीही हे सारे करताना मात्र प्रशिक्षणे हा पुन्हा वेगळाच विषय आहे. प्रशिक्षणे करावीच लागतात. जरी त्यांच्यात दर्जा नसला तरी सुद्धा आणि शेवटी कवी म्हणतो की आम्ही सारेच ‘‘शाळा’’ करतो आहोत... यात एक प्रांजळ कबुली जबाब आहे...शाळा करणे म्हणजे मराठीत देखावा करणे व फसविणे. या सर्व जंजाळात कवीला ही जाणीव आहे की या सर्व कामांमध्ये आपण आपल्या कामाला न्याय देऊ शकत नाही... ही बोचणी कवीला लागते. संपूर्ण व्यवस्थाच जणू एक नाटक करते आहे. या नाटकाचे वर्णन करणारी ही कविता आहे. शिक्षकांचे म्हणणे अल्पाक्षरात मांडलेले हे गा-हाणे आहे...

(फोटो - संग्रहित छायाचित्र)