आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Herambr Kulkarni Article About Krushnamurti Schools

दिशाहिन चिकित्सा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या ‘कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स’ या पुस्तकावर अरविंद वैद्य यांनी लिहिलेली पुस्तक समीक्षा वाचली. पुस्तकाचे मूल्यमापन करण्याचा वैद्य यांचा अधिकार असल्याने त्यांच्या मताविषयी काहीच म्हणायचे नाही. फक्त माझ्या मांडणीविषयी काही गैरसमज करणारी विधाने त्यांनी केली आहेत. यातून मी चुकीची मांडणी केली, असा समज होऊ शकतो, तो होऊ नये, यासाठी हा खुलासा :

१) पुस्तकात खूप सविस्तर मांडलेले मुद्दे त्यांनी दोन वाक्यात घेतलेत, ते असे की ‘सध्याच्या शिक्षणप्रक्रियेला कृष्णजींच्या मांडणीतून एक दिशा मिळाली.’ एवढाच दावा लेखकाने केलेला नाही, तर ‘संघटित धर्माचा पायाच त्यांच्या मांडणीने डळमळीत करून टाकला. राजकीय विचारसरणी, समाजवाद, समाजपरिवर्तनाच्या आ
The RTE Act bans corporal punishment and mental harassment. It also bans detention and expulsion. These provisions have led many teachers to question how discipline will be maintained in the classroom. The answer to this important issue was given by the well known philosopher Jiddu Krishnamurti: ?Discipline is an easy way to control a child, but it does not help him to understand the problems involved in living... If the teacher can give full attention to each child, observing and helping him, then compulsion or domination or discipline in any form may be unnecessary.पल्या कल्पना यांचा पायाच त्यांच्या मांडणीने काढून घेतला.’ असा विलक्षण दावा कुलकर्णी यांनी केला आहे.’ या माझ्या विधानाचा तपशील न देता केवळ वाक्य दिल्याने, ती हास्यास्पद ही वाटू शकतील. पारंपरिक सर्वच धर्म, ईश्वर अस्तित्व मांडून त्याधारे धर्म, मांडणी, साधना अशी रचना करतात. या उलट ‘सत्याकडे जाणारा रस्ता नसतो’ अशी मांडणी कृष्णमूर्तीनी केली. त्यांनी साधना कोणतीच न सांगता धर्माची मांडणी ही ऐहिक जगण्याच्या विश्लेषणात आणली. या अर्थाने, त्यांनी संघटित धर्माचा पाया काढला. त्याच प्रमाणे समाजपरिवर्तन करणाऱ्या चळवळी या राजकीय, आर्थिक बदलांजवळ थांबतात, ही समाजपरिवर्तनाची मर्यादा उमजल्यानेच अच्युतराव पटवर्धन राजकारण सोडून पूर्णवेळ त्यांच्या सोबत गेले. इतका गंभीर हा मुद्दा असताना अरविंद वैद्य यांनी काहीशी खिल्ली उडवावी, या पद्धतीने हे लिहिले आहे, हे क्लेशदायक आहे
२) कृष्णमूर्तींच्या प्रेमात गुरफटून मी कृष्णमूर्तींना अतिमहत्त्व दिले, हे सांगताना ते लिहितात की ‘‘एक प्रयोग म्हणून जे. कृष्णमूर्तींच्या शाळांना महत्त्व असले तरी या प्रयोगांमध्ये नवीन असे काहीही नाही. त्याचप्रमाणे जे. कृष्णमूर्तींच्या ज्या विचारांच्या आधारे या शाळा चालतात, त्या शिक्षणविषयक विचारांमध्येही नवीन असे काही नाही. विश्वकल्याणवादी मानवतेचे विचार ज्याप्रमाणे जे. कृष्णमूर्तींच्या आधीपासून हजारो वर्षे मांडले गेले आहेत, त्याचप्रमाणे त्यावर आधारलेले शिक्षणविषयक विचारही आधीपासून मांडले गेलेले आहेत.” विश्वकल्याणवादी मानवता अशा दोन शब्दांत ते कृष्णजींना गुंडाळून टाकतात. इतर अमूर्त बोलणाऱ्या बाबांसारखा हा एक बाबा, अशी त्यांची वाट लावून, त्यात काही नवे नाही असा निष्कर्ष काढतात तेव्हा, त्यांनी ते पुरेसे वाचले नाहीत, असे खेदाने म्हणावे लागते. कृष्णमूर्ती विश्वकल्याण वगैरे अमूर्त बडबड करत नाहीत. या क्षणी तुम्ही काय आहात, हे समजून घ्यायला सांगतात. मुलांना देव धर्म काहीच गृहीत न धरायला, सांगत स्वत:चे अवलोकन आपल्या दैनंदिन जीवनाचे अवलोकन करायला सांगतात. हा विचार अत्यंत प्रभावीपणे ते मांडतात हे त्यांचे वेगळेपण नाही का?
३) आजच्या शिक्षण कायद्यात मूल्यमापन पद्धती व शिक्षा न करणे या बाबी कृष्णमूर्ती शाळाकडून आल्या, हे विधान अरविंद वैद्य यांनी अतिरंजित ठरविले आहे. मुळात असे कायदे होताना ही पद्धती, या शाळेकडून शासन स्वीकारत आहे असे, काही घोषित होत नसते. परंतु परीक्षा पद्धतीला पर्याय एकदम हवेतून आलेला नाही, तर ज्या प्रयोगशील शाळांनी याबाबत प्रयोग केले, तेथील बदल अभ्यासूनच धोरणात ते येत असते. अशा वेळी ७५ वर्षे गांभीर्याने हा प्रयोग अजिबात विचारात न घेता शिक्षणतज्ज्ञांनी नवी मूल्यमापन पद्धती आणली, असे वैद्य यांचे म्हणणे आहे का? शिक्षणात ज्या समित्या असतात, त्यात कृष्णमूर्ती शाळांच्या अनेक शिक्षक-मुख्याध्यापकांनी काम केलेले आहे. ऋषि व्हॅली येथे जगभरातील अनेक तज्ज्ञ आजही भेट देतात. राहिला प्रश्न, शिक्षा आणि शिस्त याविषयी. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केलेल्या भाषणात शिक्षा केली नाही, तर शिस्त कशी राहील? या प्रश्नाचे उत्तर देताना कृष्णमूर्तींचे नाव घेऊन त्यांचे विचार जाहीर भाषणात सांगितले. ते म्हणाले की,
The RTE Act bans corporal punishment and mental harassment. It also bans detention and expulsion. These provisions have led many teachers to question how discipline will be maintained in the classroom. The answer to this important issue was given by the well known philosopher Jiddu Krishnamurti: “Discipline is an easy way to control a child, but it does not help him to understand the problems involved in living... If the teacher can give full attention to each child, observing and helping him, then compulsion or domination or discipline in any form may be unnecessary.
herambrk@rediffmail.com