आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयाचा सर्वाधिक धोकादायक शत्रू उच्च रक्तदाब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलेस्टेरॉल आणि चरबी अधिक असण्याने वाढणारे धोके पाहता हृदयाला निरोगी राखण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे वजन कमी करणे. कोलेस्टॉलवर नियंत्रण राखण्यानेही खूप फायदा हाेताे. मात्र, त्याशिवायही हृदयासाठी अनेक धोके आहेत. आता असं दिसून अाले अाहे की उच्च रक्तदाब हा हदयाचा सगळ्यात माेठा शत्रु अाहे.

अमेरिकेतील स्प्रिंट ( सिम्बाॅलिक ब्लड प्रेशर इंटरव्हेन्शन ट्रायल ) या बहुप्रतीक्षित परीक्षणाद्वारे या धाेक्याच्या इशाऱ्याला दुजाेरा देण्यात अाला अाहे. अमेरिकन हार्ट असाेसिएशनच्या ( एएचए ) वार्षिक बैठकीत या निष्कर्षांनी खळबळ उडवून दिली अाहे. ९ नाेव्हेंबरला न्यू इंग्लंड जर्नल अाॅफ मेडिसीनमध्ये प्रकाशित परिणामांमुळे विद्यमान तथ्यांबाबत प्रश्न निर्माण झाले अाहेत. त्यात म्हटले अाहे की ब्लड प्रेशर जितके कमी असेल
तितके चांगले.

स्प्रिंटनुसार १४० एमएम एचजी अाणि त्यापेक्षाही कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींचे तुलनात्मक निरीक्षण करण्यात अाले. डाॅक्टर १४० एमएमपेक्षा कमी रक्तदाब असणे ठीक मानतात. संशाेधकांनी ५० वर्षाहून अधिक अायुष्य असणाऱ्या अाणि रक्तदाबाने पीडित असलेल्या ९३०० नागरिकांपैकी १४० अाणि १२० पेक्षा कमी एमएम रक्तदाब ठेवण्याचे लक्ष्य निर्धारित केले हाेते. सिस्टाेलिक दाब हा हदयातून पूर्ण शरीरात रक्त काेणत्या गतीने पाठवले जाते, त्याचा निदर्शक अाहे. ज्यांनी १२० पेक्षा कमी रक्तदाब राखण्याचे ध्येय ठेवले, त्यांच्यात हृदयराेगाने मृत्यूचे प्रमाण कमी दिसून अाले. १२० पेक्षा कमी रक्तदाब असणाऱ्या गटातील लाेकांचे हृदय बंद पडून मृत्यूचे प्रमाणे ३८ टक्के कमी अाणि हृदयाशी संबंधित अाजारांनी मृत्यू हाेण्याचे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी असल्याचे अाढळले. हे अंतर इतके माेठे हाेते की संशाेधकांनी दाेन वर्ष अाधीच प्रयाेग बंद करून टाकले. अर्ध्या रुग्णांच्या रक्तदाबाचे प्रमाण अधिक राखणे त्यांना याेग्य वाटत नव्हते.

स्प्रिंट ट्रायलचे अध्यक्ष तुलाने विद्यापीठाचे डाॅ. पाॅल व्हेल्टन यांचे म्हणणे अाहे की , या संशाेधनाचा निष्कर्ष असा अाहे की कमी रक्तदाब अधिक चांगला अाहे. रक्तदाब कमी असण्याचे फायदे अन्य संभावित धाेक्यांच्या तुलनेत खूप अधिक अाहेत. एएचए अाणि अमेरिकन मेडिकल असाेसिएशनने अधिकांश लाेकांना १४० । ९० अाणि ६ ० वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांसाठी १५० । ९० असा रक्तदाब राखण्याची शिफारस केली अाहे.
हृदयाला क्षती पाेहाेचविणाऱ्या बाबींमध्ये उच्च रक्तदाबाचा अंतर्भाव ही काही नवीन बाब नाही. डाॅक्टरांना ही बाब अनेक वर्षांपासून ज्ञात अाहे. अति उच्च रक्तदाबामुळे हृदय अाणि रक्तधमण्यांवर दबाव पडताे. त्यामुळे लाेकांना हृदयविकार अाणि मेंदूला झटका बसू शकताे. लाेकसंख्येवर अाधारित निरीक्षणांनुसार कमी रक्तदाब असणाऱ्यांना हृदय विकारांचा धाेका असताे. त्यामुळे अकाली मृत्यू हाेण्याचे प्रमाणदेखील कमी असते. स्प्रिंट रिसर्चर अाणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी मेडिसीन स्कूलचे प्राध्यापक डाॅ. जॅक्सन राईट यांचे म्हणणे अाहे की उच्च रक्तदाबाने पीडित लाेकांचा इलाज त्या समस्यांच्या धाेक्याला कमी करताे.

काय महत्त्व अाहे रक्तदाबाचे
रक्तदाबाच्या स्तरावरून संकेत मिळताे की हृदय रक्त फेकते, तेव्हा तुमच्या धमण्यांवर किती दबाव पडताे. रक्त उतींना अाॅक्सिजन अाणि पाेषक तत्व देते. दाब वाढल्यास गंभीर समस्या हाेऊ शकते.

नवीन संशाेधन
नवीन संशाेधनानुसार सामान्य रक्तदाब १२० असावा. त्यापेक्षा कमी रक्तदाब झाल्यास अपमृत्यूचा धाेका कमी हाेऊ शकताे.

धाेक्याचे कारण
रुग्णाचा रक्तदाब कमी करण्यासाठी संबंधित डाॅक्टरला अधिक गाेळ्या देण्यापूर्वी रुग्णाच्या वयाचा विचार करावा लागणार अाहे.
आजार
> डाेळ्यांची कमजाेरी
>किडनी फेल
>ब्रेन स्ट्रोक
>हार्ट अटॅक