Home | Magazine | Madhurima | home-economy-manasi

घरातली आर्थिक, उलाढाल

गौरी विश्वासराव, चार्टर्ड अकाउंटन्ट | Update - Jun 03, 2011, 09:11 PM IST

अंगावरचे दागिने, नव-याने काढलेली एखादी पॉलिसी आणि महिन्याकाठी घरखर्च भागवण्यासाठी हातात येणारी रक्कम एवढाच काय तो महिलांचा पैशांशी येणारा संबंध. पण घरातल्या सगळ्यांच्या मनातलं जाणणा-या.या मानसीच्या मनी काय आहे ते जाणून घेऊया, या सदरातून...

  • home-economy-manasi
    गुंतवणूक, आर्थिक उलाढाल या संकल्पना महिलांच्या दैनंदिन किंवा त्यांच्या आयुष्याचा भाग होताना दिसत नाहीत. काही जणी याला अपवाद असतीलही; पण बहुतांश या संकल्पना महिलांच्या कक्षेत येत नाहीत. महिलांची गुंतवणूक फार तर दागिन्यांपुरती किंवा नवरा अथवा वडिलांनी काढलेल्या डिपॉझिट वा विमा पॉलिसीपुरती मर्यादित असते. आर्थिक उलाढाल महिन्याच्या मिळकतीवरून महिन्याचा खर्च भागवणे यापुरतीच असते; पण बचत मात्र प्रत्येक स्त्री मग ती गृहिणी असो, नोकरदार अथवा व्यावसायिक स्त्री करतच असते. बचत नक्की कशी करावी याबाबत मात्र गोंधळच असतो. बचत करण्यासाठी खर्चावर नियंत्रण गरजेचे आहे. एखादी संस्था किंवा कंपनी आपल्या खर्चावर कसे नियंत्रण ठेवते हे माहीत असले पाहिजे. त्याच्या अनेक पद्धतींपैकी एक म्हणजे 'एबीसी अॅनालिसिस' यामध्ये कंपनी आपला खर्च तीन भागांत विभागते. 'अ', 'ब' आणि 'क' असे तीन भाग असतात. 'अ' गटात असे खर्च येतात ज्यांची वारंवारता खूप कमी; पण ज्यात जास्तीत जास्त पैसा खर्च होतो. 'क' गटात असे खर्च मोडतात, ज्यांची वारंवारता खूप जास्त पण एकत्रितपणे त्यांची किंमत खूप कमी असते. 'ब' गटात असे खर्च मोडतात, ज्यांची 'क' गटापेक्षा कमी अणि वारंवारता किंमत 'अ' गटापेक्षा कमी असते. 'अ' गटाची किंमत एकूण खर्चाच्या ७५ टक्के होते, तर उरलेला खर्च 'ब' व 'क' गटात होतो. एकदा सर्व खर्च असे विभागले गेले की कंपनी 'अ' गटावर सर्वांत जास्त नियंत्रण ठेवते. 'क' गटावर अगदीच नगण्य तर 'ब' गटावर साधारण नियंत्रण असते. आपणही आपले घरखर्च वर सांगितल्याप्रमाणे तीन गटांत विभागू शकतो. म्हणजे अपला गोंधळ होणार नाही की नक्की कोणत्या खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर ('क'गट) नियंत्रण करायला जातो आणि कंजूष ही पदवी पदरी येते. त्यापेक्षा अश गोष्टींवर नियंत्रण ठेवा, ज्या 'अ' गटात मोडतात. त्या नियंत्रण ठेवायला सुलभ असतात कारण त्यांची वारंवारता खूप कमी असते; पण खर्च खूप मोठा असतो. 'ब' गटावरही पुरेसे नियंत्रण असू द्या, कारण या गटाचा ताळमेळ बिघडला तर तो खर्चाने 'अ' गटात आणि वारंवारतेच्या दृष्टीने 'क' गटात जाण्यास वेळ लागणार नाही. आज शिकलेली ही सोपी युक्ती तुम्ही नक्की आजमावून बघा. आपला महिन्याचा घरखर्च तीन गटांत विभागून कुशलतेने घरखर्चावर नियंत्रण करायला सुरुवात करूया.

Trending