आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डर्क हॅमर सिंड्रोम, होमिओपॅथी उपचाराचे वरदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होमिओपॅथीत सर्व आजारावर औषधोपचार उपलब्ध, साइड इफेक्ट नाही : वैद्यकीय शास्त्रात सर्वात आवश्यक चिकित्सापद्धती म्हणजे होमिओपॅथी होय. जर्मन चिकित्सक डॉ. सॅम्युअल हॅनेमन हे या शोधाचे जनक आहे. होमिओपॅथी ही नैसर्गिक सिद्धांतावर आधारित परिपूर्ण वैद्यकीय शाखा असल्यामुळे या शास्त्रांतर्गत शरीरात रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित होऊन आजार समूळ नष्ट होतो. विशेष म्हणजे या पॅथीमध्ये सर्वच प्रकारच्या आजारावर औषधोपचार उपलब्ध आहेत. ही औषधे घेण्यास अत्यंत सोपी व शरीरावर कोणतेही दुष्परिणाम करीत नाहीत. त्यामुळे डर्क हॅमर सिंड्रोमचे वरदान ठरले आहे.

तंत्रज्ञानामुळे व आधुनिक शास्त्रीय प्रगतीमुळे जीवन अधिक सुलभ व आरामदायक झाले असले तरीदेखील रोगांचा प्रादुर्भाव आणि सतत शारीरिक व मानसिक ताण यामुळे जीवनाची गुणवत्ता खालावत चालली आहे, असे आजचे चित्र आहे. रोगांवर शास्त्राने चांगली संशोधने केलेली असली तरी कोणत्याही रोगाशी झुंजण्यासाठी सशक्त प्रतिकार शक्तीची खरी गरज आहे आणि हे सर्व शक्य आहेत म्हणजे होमिओपॅथीच्या सिद्धांतावर आधारित रोगनिदान व उपचार पद्धतीवर.

40 हजार कॅन्सर रुग्णांच्या तपासणीनंतर निष्कर्र्ष :
आजाराचे मूळ हे प्रत्येकाची मानसिक स्थिती, विचार, चिंता, किंवा काळजी, आयुष्यातील सुखद-दु:खद घटनांमध्ये समावलेले आहे. या सर्वांचा अनुभव तज्ज्ञांनी वेगवेगळ्या आजारी रुग्णांंवर अभ्यासलेला आहे.अशाच प्रकारे डॉ.हॅमर यांनी स्वत:च्या मुलावर संशोधन केले. त्यानंतर डॉ. हॅमर यांना टेस्टिसच्या कॅन्सरचे निदान झाले. यासाठी त्यांनी 40 हजार कॅन्सरच्या रुग्णांची तपासणी केली. त्यातून प्रभावी फॉर्म्युल्याचे निष्कर्ष काढले .

लक्षणांच्या समूहानुसार औषध :
होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये लक्षणांच्या समूूहानुसार औषध ठरवले जाते, परंतु जैविक संघर्षावरून प्रत्येक व्यक्तीवरील आघाताच्या परिणामानुसार आपण त्या व्यक्तीतील आजाराच्या लक्षणाचा केंद्रबिंदू निवडून औषधोपचार करू शकतो.

जैविक संघर्षाची उदाहरणे :
1) विभक्त संघर्ष -एकटेपणाची भावना, यात प्रामुख्याने मग्नेशियम कार्व,अर्सेनिक या औषधांचा वापर होतो.
2) टेरिटोरीयल लॉस -नोकरी जाणे किंवा कुटुंबातील व्यक्तीचे निधन याचा प्रभाव मेंदूवर होऊन करोनरी आर्टचे आजारनिर्माण होतात.यात विशेषत: ऑरम, मेट,अ‍ॅब्राग्रासिया, हायोसायमस्,या औषधांचा वापर करून आजाराचे निर्मूलन होते.
3) आत्म खच्चीकरण संघर्ष - निष्क्रिय भावना, स्वत:ची घृणा इत्यादींच्या परिणामामुळे हाडांचे तसेच स्नायूंचे आजार होतात.

गैरसमजाचा भ्रम :
दुदैवाने लोक होमिओपॅथीकडे तेव्हाच जातात जेव्हा गंभीर समस्या आणखी जुनी झालेली असते. साहजिकच अशा प्रकरणांमध्ये उपचार करण्याला कालावधी जास्त लागतो आणि लोक होमिओपॅथी तेव्हा स्वीकारतात जेव्हा बाकी उपचार पद्धती अयशस्वी होते, परंतु आजारी लोकांना सर्वांगीण व सुरक्षित पद्धतीने बरे करण्यासाठी या शास्त्राचा भविष्यकाळ अधिक उज्ज्वल करण्यासाठी, जोपासणे हेच आमचे ध्येय आहे.