आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आयआयएम’च्या अभ्यासक्रमासाठी ‘कॅट-2012’ प्रवेश परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आयआयएम’ म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता, इंदोर, काशीपूर, कोझीकोडे, लखनऊ, रायपूर, रांची, रोहतक, शिलाँग, त्रिचरापल्ली व उदयपूर येथे प्रवेश देण्यासाठी व व्यवस्थापन विषयातील संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असायला हवेत व त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी 50% असायला हवी.
प्रवेश प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्याथी-उमेदवारांना निवड प्रक्रिया-परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही परीक्षा निर्धारित प्रवेश परीक्षा केंद्रांवर 11 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2012 च्या दरम्यान घेण्यात येईल. निवड प्रक्रियेत लेखी निवड परीक्षा, समूह चर्चा व वैयक्तिक मुलाखतीचा समावेश असेल.
उमेदवारांनी वरील निवड प्रक्रियेत मिळवलेल्या एकूण गुणांकाच्या आधारे त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संबंधित शाखेमध्ये प्रवेश देण्यात येईल.
लेखी निवड परीक्षेशी संबंधित अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या www.catiim.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रकासाठी वरील संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज व माहितीपत्रक 1600 रु. रोखीने (राखीव गटातील उमेदवारांसाठी 800 रु.) भरल्यास ऑफिस बँकेच्या कुठल्याही शाखेत उपलब्ध होऊ शकेल.
अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादच्या www.iimahd.ernet.in वा आयआयएमच्या संबंधित केंद्राच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2012 अहे.
ज्या पदवीधरांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसारख्या प्रथितयश संस्थेतून व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम वा संशोधनपर फेलोशिपसह पीएचडी करायची असेल अशांनी या स्पर्धा प्रवेश परीक्षा कॅट-2012चा अवश्य फायदा घ्यावा.
dattatraya.ambulkar@gmail.com