आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन आणि रणजित : एक नारद, दुसरा टपोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी चित्रपटामधील व्हिलनची नस बरोबर पकडणार्‍या आणि त्यानुसार काम करणार्‍या नटांमध्ये जीवनची गणना नेहमीच होईल. एँऽऽऽ करून वाक्याची सुरुवात करणे, हातामध्ये एखादी छडी किंवा मफलरचे टोक घेऊन त्याच्याशी चाळा करत चावून चावून संवाद म्हणणे, ही यांची खासियत.

24 ऑक्टोबर 1915 रोजी श्रीनगरमध्ये ओंकारनाथ धर अर्थात जीवनचा जन्म झाला. शिडशिडीत बांधा, गरुडासारखे नाक, खप्पड बसलेले गाल आणि सर्वात महत्त्वाची भिरभिरणारी मिचमिची नजर. त्या नजरेमध्ये कावा अधिक आणि त्यामुळेच कळलाव्या नारदाच्या भूमिकेमध्ये 1950च्या सुमारास जीवनची पडद्यावर एंट्री झाली. नारदाच्या भूमिकेला न्याय देणारी सर्व हत्यारे त्यांच्याकडे होती. फक्त गळ्यात तंबोरा आणि वाणीमध्ये नारायणऽ नारायणऽऽ नावाची न थांबणारी टेप चालू झाली, की हा अवतार तिन्ही त्रिकाळ सर्वत्र संचार करण्यास मुक्त असे. अर्थात, अशा छोट्या छोट्या पौराणिक कथांच्या चित्रपटांमधून निर्वेध संचार करून झाल्यावर जीवनला पहिली बिग बजेट फिल्म मिळाली ‘फॅशनेबल इंडिया’, नंतर आली ‘रोमँटिक इंडिया’. हे होते 1935चे साल. त्यानंतर स्टेशन मास्टर (1942), अफसाना (1946) हे काही उल्लेखनीय चित्रपट. 1950 पर्यंत जीवन बर्‍यापैकी स्थिरस्थावर झाला होता.
एँऽऽऽ करून वाक्याची सुरुवात करणे, हातामध्ये एखादी छडी किंवा मफलरचे टोक घेऊन त्याच्याशी चाळा करत चावून चावून संवाद म्हणणे ही यांची खासियत. रेकल्यासारखे शब्दांना खेचत बोलण्याची पद्धत अनेक नकलाकारांना खाद्य पुरवत असे.
दो फूल, नौ दो ग्यारह, कानून, नया दौरमधील बसवाला, धरमवीरमधला कपटी, अमर अकबर अँथोनीमधला रॉबर्ट या भूमिका जीवनसाठीच लिहिल्या गेल्या आणि त्याने त्या जिवंतही केल्या. प्राण आणि त्याच्या अमर अकबरमधील एका सीनमध्ये प्राणला आपले बूट साफ करायला लावताना तो त्या बूटवर व्हिस्की टाकतो आणि पुन्हा साफ करण्यास सांगतो. ‘चमकना चाहिए, थोबडा दिखना चाहिए’ असे अत्यंत माजोरड्या आवाजात म्हणतो आणि मनमोहन देसाईंच्या चित्रपटात नेहमी घडणार्‍या गोष्टींप्रमाणे काळ बदलतो. श्रीमंताचा भिकारी होतो आणि भिकार्‍याचा श्रीमंत. तेव्हा असाच सीन प्राण आणि जीवनमध्ये घडतो. माणसांच्या जागा बदललेल्या असतात. आता प्राणचे बूट जीवन साफ करत असतो, तेव्हा त्याने केलेल्या विनवण्या त्याचा पूर्वीचा माज विसरायला लावणार्‍या असतात.
हिंदी चित्रपटामधील व्हिलनची नस बरोबर पकडणार्‍या आणि त्यानुसार काम करणार्‍या नटांमध्ये जीवनची गणना नेहमीच होईल.
श्रीमंत, कावेबाज, गरिबांबद्दल तुच्छता, मोटारगाड्या, बंगले, थ्री पीस सूट, सोनेरी काड्यांचे चश्मे, जाकिटाच्या वरच्या खिशात चेन लावलेले घड्याळ, चकाचक बूट, हातात उंची काश्मिरी चांदीच्या मुठीची काठी, तोंडात सिगरेट होल्डरसह सिगारेट वा चिरूट अशा रुबाबात वावरणारा जीवन क्वचितच ‘जॉनी मेरा नाम’मधील ‘हिरा’ नावाच्या चोराच्या भूमिकेमध्ये पोलिस लॉकअपमध्ये भेटतो. पण इथेसुद्धा हा हिर्‍यांचा चोरटा व्यापार करणाराच असतो. याचे सगळे काळे धंदे उच्चभ्रू समाजामधील. कळत नकळत झालेली जीवनची ही प्रतिमा त्याने पुढे नेण्याचा आपणहून प्रयत्न केला नाही.
मात्र याच्या अगदी उलट रणजितने पडद्यावर ज्या भूमिका केल्या त्या पार रस्त्यावरच्या टपोरीच्या, गल्लीतल्या दादाच्या, मटक्याच्या अड्ड्यावरील बुकीच्या किंवा रेड लाइट एरियातील दलालांच्या होत्या.
‘अमर अकबर...’मध्येच शबाना आझमीला वाईट धंदे करायला लावणारा आणि साळसूदपणे ‘क्या हुआ बहना? ये आदमी आपको छेड रहा है?’ म्हणत जणू काही अडचणीत सापडलेल्या अबलेला मदत करण्यासाठी देवदूत बनून आलेल्या सज्जन माणसाचा आव आणणारा दलाल भाऊ आठवून पाहा.

पुढील स्लाइडमध्ये, रणजित