आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिसतं तसं नसतं...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतंही छायाचित्र दिसतं तसं नसतं. म्हणूनच बघणारं जग फसतं. स्ट्रीट फोटोग्राफीत अशा फसव्या किंवा गूढ जागा खूप असतात, त्या निर्माण करण्यात छायाचित्रकाराचं आणि शोधून काढण्यात बघणाऱ्यांचं कौशल्य असतं...
हे छायाचित्र स्ट्रीट फोटोग्राफी या प्रकारातलं आहे. स्ट्रीट फोटोग्राफी पाहताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे, तुम्ही जे छायाचित्र पाहताय, त्यात दिसणारी वस्तुस्थिती खरी असेलच, असं नाही. बरेचदा छायाचित्र अशा प्रकारे काढलेलं असतं की, त्यातून नाट्य निर्माण होईल. उदाहरणार्थ, या छायचित्रामध्ये नेमकं काय चाललंय? पोलिस कशाला आलेत? कुठे आलेत? मागच्या जिन्यावरून उघड्या अंगाच्या दोन व्यक्ती कुठं जाताहेत? ते पोलिसांची नजर चुकवून तर पळत नाहीयेत ना? पोलिस नेमकं फोनवर कोणाशी बोलताहेत? असे अनेक प्रश्न यातून उभे राहतात. रिचर्ड कलवार नावाचा एक फार मोठा स्ट्रीट गूढ सत्य फोटोग्राफर होऊन गेला. त्याच्या फोटोंमध्ये अशा प्रकारचं नाट्य भरलेलं असायचं. तो त्याच्या छायाचित्रामागील गूढ सत्य कधीच उलगडून सांगायचा नाही. कारण त्या छायाचित्रातली मजा, गूढता निघून जाते, असं त्याचं म्हणणं असायचं. आणि हे खरंही आहे. त्यामुळे मीसुद्धा या छायाचित्रातील सत्यता काय आहे, हे तुम्हाला सांगणार नाहीये. त्यापेक्षा प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक गोष्ट तयार होऊ दे. यातच स्ट्रीट फोटोग्राफीची खरी मजा आहे...
indrajitmk804@gmail.com