आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेन्स आय: प्रश्‍नचिन्हांचा पाठलाग...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र माझ्या ‘चेझिंग दी क्वेश्चन मार्क’ या मालिकेतील आहे. छायाचित्राची पार्श्वभूमी माहीत करून घेण्यापूर्वी तुम्हाला प्रेक्षक म्हणून काही अंदाज येतोय का? छायाचित्रातील सलाइनला जोडलेला हात व त्या हाताकडे पाहणारा काळजीनं भरलेला एका मुलीचा डोळा. तिच्या केसांमधून अलगद फिरणाऱ्या पेशंटच्या दुसऱ्या हाताची छायाचित्रित झालेली हालचाल. काय कथा असेल त्यामागे?
हे छायाचित्र आहे, माझ्या मुलीचं व पत्नीचं. माझी पत्नी सीमा दुसऱ्या बाळंतपणावेळी उद‌भवलेल्या काही वैद्यकीय अडचणींमुळे जवळपास ३५ दिवस रुग्णालयात होती. त्या वेळी माझी मुलगी सईसुद्धा आमच्यासोबतच असायची. अशी छायाचित्रं काढण्यासाठी तुम्हाला छायाचित्रकार म्हणून एक अनुभवाची अलिप्तता जपावी लागते. त्यात जर ती व्यक्ती आपल्या जवळची असेल तर हे काम कित्येक पटीनं कठीण होऊन जातं. पण, शेवटी तुम्हाला एखाद्या प्रसंगाकडे एकाच वेळी संवेदनशीलतेनं व सेकंदाच्या काही हिश्श्याइतक्या वेळापुरतं अलिप्ततेनं पाहता आलं पाहिजे. हे जमलं तरच चांगलं छायाचित्र निर्माण करू शकू. माझी ही छायाचित्र मालिका अरियानो फोटो फेस्टिवल इटली, इंडियन फोटो फेस्टिवल हैदराबाद यात प्रदर्शित झाली. तसंच बेटर फोटोग्राफी या मॅगझिनमध्येही छापून आली आहे. संपूर्ण मालिका गुगल करून पाहता येईल.
इंद्रजित खांबे
indrajitmk804@gmail.com