आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूळव्याध आणि होमिओपॅथिक उपचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाॅ. गजानन सुपेकर, - Divya Marathi
डाॅ. गजानन सुपेकर,
मूळव्याध या अाजाराकडे घाण म्हणून बघितलं जातं. एखाद्याला मूळव्याध अाहे असे समजतात चेहऱ्यावरील रेषा बदलतात. पण खरेतर मूळव्याध असणाऱ्या व्यक्तीने असे वाटून घेण्याचे काहीही कारण नाही. हाेमिअाेपॅथी उपचाराद्वारे मूळव्याध बरा हाेऊ शकताे. यासंदर्भातील या लेखातून मार्गदर्शन.
 
गुद‌्द्वाराच्या मार्गातील किंवा गुद‌्द्वाराला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवरचा दाब वाढून रक्तवाहिन्यांवर सूज येणे म्हणजे मूळव्याध. सध्याच्या जीवनशैलीमुळे आढळून येणारी अत्यंत सामान्य समस्या म्हणून ‘मूळव्याध’ या आजाराकडे बघितले जाते. मूळव्याध या समस्येने त्रस्त असणाऱ्या व्यक्तीला आपल्या दैनंदिन गोष्टी करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. अशा रुग्णांना बसण्यासाठी, चालण्यासाठी, वाहन चालवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शौचास जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. ‘‘मूळव्याध’’ ही समस्या प्राथमिक स्वरूपात असताना उपचार घेतल्यास नियंत्रणात ठेवता येते. 
 
मूळव्याध या आजारात शरीरातील रक्तवाहिन्यांची अंतर्गत प्रणाली विस्कळीत झालेली असते. गुदमार्गातील व गुद‌्द्वारातील रक्तवाहिन्या एकमेकांना जोडलेल्या (anastamosis) असल्यामुळे तेथील रक्तवाहिन्यांचा भाग कमजोर असतो. रक्तवाहिन्यातील दाब वाढून त्या रक्तवाहिन्यांवर सूज येते व रक्तवाहिन्यांवरील दाब प्रमाणापेक्षा जास्त वाढला तेव्हा रक्तवाहिन्या फुटून शौचाद्वारे/शौचानंतर रक्त पडत असल्याची तक्रार रुग्ण करू लागताे. याच समस्येला मूळव्याध असे संबोधले जाते. 

होमिओपॅथिक उपचार : मूळव्याधसाठी होमिओपॅथिक वैद्यकीय शास्त्रात सुरक्षित, अत्यंत गुणकारी, तर्कशुद्ध औषधी उपलब्ध आहेत, याशिवाय मूळव्याध या समस्येचा समूळ नाश करण्यासाठी हे उपचार खिशाला परवडणारे पण आहेत. होमिओपॅथिक औषधी पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवलेली असतात. कुठल्याही प्रकारे अंतर्गत प्रक्रिया - शस्त्रक्रिया न करता अत्यंत साध्या पद्धतीने या उपचारांचा उपयोग मूळव्याध या समस्येला दूर करून आपल्या आयुष्याचा आनंद मोकळेपणाने अनुभवण्यासाठी करता येऊ शकतो. ही औषधी गर्भधारणा असणाऱ्या स्त्रियांवर पण सुरक्षितरित्या वापरता येतात आणि त्याचा कुठलाही दुष्परिणाम मातेवर व बाळावर होत नाही.  जेव्हा एखादा रुग्ण होमिओपॅथिक उपचार सुरू करतो त्यावेळेपासूनच या औषधांचा परिणाम रुग्णाला जाणवायला लागतो. या औषधींचा परिणाम हळूहळू जाणवतो हा चुकीचा गैरसमज जणमानसात आहे. उपचार सुरू केल्यानंतर वेदना, गुद‌्द्वाराभोवती येणारी खाज, दाह, रक्तस्राव या समस्येत सुधारणा होत असल्याचा अनुभव रुग्ण घेऊ शकतो.
 
 होमिओपॅथिक उपचारांद्वारे शरीरातील अंतर्गत 
विस्कळीत झालेली रक्तवाहिन्यांची रचना पूर्ववत करण्यात येते. मूळव्याध या समस्येची प्रवृत्ती
असणाऱ्या व्यक्ती होमिओपॅथिक उपचारांद्वारे या समस्येवर मात करू शकतात.
 drgajanansupekar18@gmail.com
 
पुढील स्लाइडवर वाचा, मणक्यांसाठी ‘मिस’ आणि रिंकल्स कमी करणारी स्ट्राॅबेरी...
बातम्या आणखी आहेत...