Home | Magazine | Divya Education | information about agriculture field

कृषी व्यावसायिक असतात अॅग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट

उषा अल्बुकर्क | Update - Dec 28, 2015, 03:00 AM IST

अॅग्रिकल्चर इकॉनॉमी म्हणजेच कृषी अर्थशास्त्र खरे पाहता एक असे बहुआयामी क्षेत्र आहे जिथे शेती, शेतकऱ्यांशी जोडलेल्या समस्यांच्या सोडवणुकीचे समाधान आणि लघु अर्थशास्त्राच्या सिद्धांताच्या मदतीने आधार शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

 • information about agriculture field
  अॅग्रिकल्चर इकॉनॉमीत पदवी करण्यासाठी कमीत कमी ५५ टक्के गुणांसह १० अधिक २ परीक्षा (भौतिक, रसायन विज्ञान, जीवविज्ञान वा गणितासह) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

  अॅग्रिकल्चर इकॉनॉमी म्हणजेच कृषी अर्थशास्त्र खरे पाहता एक असे बहुआयामी क्षेत्र आहे जिथे शेती, शेतकऱ्यांशी जोडलेल्या समस्यांच्या सोडवणुकीचे समाधान आणि लघु अर्थशास्त्राच्या सिद्धांताच्या मदतीने आधार शोधण्याचा प्रयत्न केला जातो. कृषी अर्थशास्त्रज्ञ शेती आणि अन्य कृषी उद्योगांच्या संबंधांचे कामकाज सांभाळतात. या दिशेने व्यापाराची अवधारणा वा दिशा आणि समस्यांचे समाधान काढण्यासाठी तंत्राचा वापरदेखील करतात. ते बाजारावर नजर ठेवतात आणि कृषी उत्पादनांवर आधारित बाजारातील किमतींचे अंदाज वा बाजारभावाचा कल काढतात. त्यासंबंधीची भविष्यवाणी करतात. एक कुशल आणि जागरूक कृषी अर्थशास्त्री पिकांच्या किमती, पशुधनाचे आरोग्य स्वास्थ्य, आयात आणि निर्यात, मौसम चक्र आणि कृषी उत्पादन वाढवण्याचे तंत्र, पद्धती यावरदेखील नजर ठेवून असतात.

  पात्रता वा योग्यता
  कृषी शाखेत पदवीसाठी कमीत कमी ५५ टक्के अंकांसह १० अधिक २ परीक्षा (भौतिकी, रसायनविज्ञान, जीवविज्ञान वा गणितासह) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाचा कमीत कमी कालावधी आहे ४ वर्षे आणि अधिकांश विद्यापीठे व संस्था पदव्युत्तर स्तरावर, पदवी स्तरावर कृषीला एक विषय वा तज्ज्ञाच्या स्तरावर ऑफर करतात.

  कुठून करणार शिक्षण
  पदव्युत्तर वा डॉक्टरेट स्तरावरचे शिक्षण व कृषी अर्थशास्त्र अनेक विद्यापीठे वा संस्थानांत उपलब्ध आहेच. यातील काही या प्रकारचे आहे-
  भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली icar.org.in - कृषी विज्ञान विद्यापीठ, बंगळुरू. uasbangalore.edu.in - बागवानी एवं वानिकी विद्यापीठ, हिमाचल प्रदेश yspuniversity.ac.in - पंजाब कृषी विद्यापीठ pau.edu

  संधी
  अॅग्रिकल्चर इकॉनॉमिस्टसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जसे - प्रशासन - प्रबंधन आणि वित्तीय सल्लागार - बँक - शैक्षणिक आणि अनुसंधान संस्थानात - सल्लागार फर्म - अॅग्रो फूड कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय सहायता एजन्सीजमध्ये - कॉलेज आणि विद्यापीठ स्तरावर शिक्षणकार्यात विद्यार्थी या क्षेत्रात संशोधनाचा मार्गही निवडू शकतात.

  उषा अल्बुकर्क, संचालक, करिअर स्मार्ट लिमिटेड.

Trending