आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्पोरेट वुमन-चंदा कोचर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या यशोशिखरावरचं एक नाव म्हणजे चंदा कोचर. करिअर करताना कुटुंब सांभाळणा-या महिलांसाठी आयकॉन ठरलेल्या चंदा कोचर यांचं वास्तविक स्वप्न होतं आयएएस ऑफिसर होण्याचं. मात्र, मुंबईतल्या जयहिंद कॉलेजमधून अर्थशास्त्रातली पदविका, जमनालाल बजाज संस्थेत फायनान्समधून एमबीए केल्यानंतर आयसीआयसीआयच्या कॅम्पस मुलाखतीमधून त्यांची निवड झाली आणि त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. आयसीआयसीआयमध्ये कोचर यांच्या काम आणि गुणवत्तेमुळे त्यांचे अनेक वरिष्ठ सहकारीदेखील प्रभावित झाले होते. 2000 मध्ये बँकेच्या रिटेल ऑपरेशन्स विभागाच्या प्रमुखपदी असताना कोचर यांनी बँकेचा रिटेल बिझनेस 67 टक्क्यांनी वाढवला. कोचर यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने देशभरात 2,900 शाखांसह देशातील दुस-या क्रमांकाची बँक होण्याचा मान पटकावला. गुणवत्तापूर्ण कामामुळे वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी सर्वाेच्च बँकिंग संस्थेत सीईओ होण्याचा मान पटकावणा-या त्या एकमेव महिला आहेत. फोर्ब्स आणि फॉर्च्युन मासिकांच्या मोस्ट पॉवरफुल वुमन्सच्या यादीत सातत्याने आपले स्थान राखणा-या व्यक्तींपैकी चंदा कोचर या एक आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत 2010 मध्ये त्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आले.