Home | Magazine | Niramay | information on Strawberries

रिंकल्स कमी करणारी 'स्ट्राॅबेरी'

डाॅ. शीतल गायधनी, अाहारतज्ज्ञ | Update - Jun 19, 2017, 03:28 AM IST

स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन C51.5grams चा खूप चांगले सौरचे असून यात अँटी ऑक्सिडट, रिंकल्स कमी करण्यास उपयोगी, कमी कॅलोरीएस, ब्रेन वाढी करता उपयोगी, डायबटिक पेशंट करता चांगली असते.

 • information on Strawberries
  स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन C51.5grams चा खूप चांगले सौरचे असून यात अँटी ऑक्सिडट, रिंकल्स कमी करण्यास उपयोगी, कमी कॅलोरीएस, ब्रेन वाढी करता उपयोगी, डायबटिक पेशंट करता चांगली असते. प्रि नेटल बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील उपयाेगी असते. स्ट्रॉबेरीचे फ्लेवर्स सगळ्यांना आवडतात. ज्युस, आईस्क्रीम, जामही. मिळतात. पण स्ट्रॉबेरी ही सलाडमध्ये किंवा तशीच खावी.
  करंबेरी : करंबेरी cranberry, म्हणजेच करवंद. 1 कप करवंदामध्ये व्हिटॅमिन C 7.3mg ,व्हिटॅमिन्स E 6.4grams,कॅल्शियम 4mg,कार्बोहायड्रेट्स 6.71grams, प्रोटेइन्स 0.21grams, फायबर 2.5grams आहेत. करवंद हे सतत होणाऱ्या युरिन इन्फेक्शनकरिता गुणकारी आहे, दातातील इन्फेक्शन, प्रोस्टेट कॅन्सर, त्वचेच्या आजारांसाठक्ष गुणकारी असतात. करंवद साधे मीठ लावून, ओटसमध्ये टाकून, फ्रूट सलाडमध्ये एकत्र करून खावे.
  ब्लॅकबेरी : 1 कप ब्लॅकबेरीमध्ये 62 कॅलोरीएस,1 ग्रॅम्स फॅट, 2 ग्रॅम्स प्रोटीन,14 ग्रॅम्स कार्बोहायड्रेट्स, 8 ग्रॅम्स फायबर आहेत. व्हिटॅमिन्स C,E,K चे प्रमाण भरपूर आहे. तसेच, झिंक, मॅग्नेशियम, आयर्न आहे. त्यामुळे रक्तदोष, हृदयविकार, त्वचेचे आजार याकरिता सलाडमध्ये
  टाकून खावे.
  गूसबेरी : 1 कप गुसबेरी मध्ये व्हिटॅमिन्स C 70 ग्रॅम्स ,व्हिटॅमिन्स A, आह. इंडियन गूसबेरी म्हणजे आवळा, आवळा हा प्रतिकारकक्षमता वाढवतो, डोळ्यांसाठी उपयोगी, डायबेटिस पेशंटने तर रोज खावा, केसांच्या आजारांकरिता उपयोगी, केसाची चमक वाढवतो. पचनशक्ती सुधारते. अनेक पदार्थ बनवले जातात लोणचे, सुपारी, सरबत, मोरावळा, जेवणानंतर खावे.
  रासपबेरी : रासपबेरी 1 कप रासपबेरीमध्ये फायबर 5 ग्रॅम्स, व्हिटॅमिन्स C 54 ग्रॅम्स आहे. त्वचेवर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी, डिलिव्हरीनंतर दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी खावे. सलाडमध्ये टाकून अथवा तशी खाणे जास्त गुणकारी.
  पुढील स्लाइडवर वाचा, महिलांपेक्षा पुरुषांमध्ये उच्चरक्तदाबाचे प्रमाण अधिक...

 • information on Strawberries
  महिलांपेक्षा पुरुषांमध्ये उच्चरक्तदाबाचे प्रमाण अधिक
   
  हेल्थ प्लस या आरोग्य विमा कंपनीतर्फे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार, ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांपेक्षा १८ टक्के अधिक नाशिककर पुरुषांमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसत अाहे. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या कालावधीत १२,८३७ व्यक्तींनी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या करून घेतल्या. त्यांच्या निरीक्षणातून हा अहवाल तयार झाला अाहे. या अहवालानुसार, स्त्री व पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणात उच्च रक्तदाबाचा त्रास दिसून येत असला तरी त्यातील ३३ टक्के लोकांना हृदयविकाराच्या झटक्याचा धोका संभवत असून ३० टक्के लोकांना कोरोनरी हृदयविकाराचा धोका संभवतो. तपासणीसाठी आलेल्या लोकांपैकी ५५ टक्के लोकांच्या समस्या या त्यांच्या बेशिस्त जीवनशैलीमुळे जन्माला आल्या असून यापैकी बहुतेक सर्व ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील होते.

  आरोग्य तपासणी तज्ज्ञ अमोल नाईकवाडी म्हणतात,‘‘उच्च रक्तदाबाच्या छोट्या-मोठ्या लक्षणांपासून ९०  टक्के लोक अनभिज्ञ आहेत. उच्च रक्तदाब आणि त्यासंबंधीची गुंतागुंत रोखण्यासाठी घ्यावी लागणारी काळजी नाशिककर तितक्याशा गांभीर्याने घेत नाहीत. शहरी भागातील लोक कामाचा ताण आणि नोकर्‍यांचे अस्थैर्य ही कारणे उच्च रक्तदाब व तणावासाठी पुढे करतात तर, ग्रामीण किंवा निमग्रामीण भागातील लोक महागाई हे त्यांच्या उच्च रक्तदाबामागील महत्वाचे कारण असल्याचे सांगतात. 
  योग्य वेळी योग्य ते उपचार न घेतल्यास, उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, मूत्रपिंड विकार किंवा बहुअवयव विकार उद्भवू शकतात. वेळोवेळी तपासण्या केल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी करता येतो.’’
   
 • information on Strawberries
  डाॅ. शीतल गायधनी, अाहारतज्ज्ञ

Trending