आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे.
तर या आजाराची साधारण कारणे व सहज घरी करण्याजोगे उपाय आपण बघूया.
कारणे -
1) तणावपूर्ण वातावरणात जगणे, काम करणे.
2) उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे- उदा. कॉफी, बिअर, सिगारेट, उत्तेजक दृश्य बघणे, विचार करणे.
3) आयुर्वेदानुसार मलबद्धता हेही एक मुख्य कारण आहे.
4) उपाशी झोपणे, पोटाच्या आजाराच्या समस्या
5 ) रात्री जास्त प्रमाणात पाणी पिणे, त्यामुळे लघवीसाठी वारंवार उठावे लागणे.
6) मनाला उत्तेजना देणारे कार्य करणे. उदा. रात्री झोपताना टीव्ही बघणे.
7) अपेक्षांचे अति ओझे असणे, त्यामुळे सतत विचार करणे.
8) पिझ्झा, बर्गर, वडापाव, चायनीजसारखे कुपोषण करणारे पदार्थ खाणे.
9) प्रेमभंग, करिअर समस्या, असमाधानी जीवन.
10) वाढत्या अभ्यासाचे क्षेत्र. या वा इतर कारणांनी निद्रानाश होऊ शकतो. झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच ब्लडप्रेशर वाढणे, पोटाच्या समस्या, मानसिक विकार इत्यादी समस्यांनी आपण ग्रस्त होतो. यासाठी खालील साधारण उपाय करावेत.
उपाय -
1. नियमित व्यायाम केल्याने शरीराचे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते व त्यामुळे झोप येते.
2. योगा, प्राणायाम व देवाची प्रार्थना केल्यास मन शांत होते व व्यवस्थित झोप येते.
3. रात्रीचे जेवण हलके घ्यावे व जास्त पाणी पिऊ नये.
4 रात्री झोपताना मनाला आवडेल असे संगीत ऐकावे. दीर्घ श्वसन केल्यास मनाचा अति चंचलपणा कमी होतो.
5. अति तिखट, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे.
6. झोपण्याच्या बेडचा उपयोग केवळ झोपण्यासाठीच करावा. यावर लॅपटॉप बघणे, मोबाइल खेळणे इत्यादी उपद्व्याप करू नयेत. जेणेकरून शरीराला एक सवय पडेल की बेड केवळ झोपण्यासाठीच आहे. प्राणीदेखील झोपण्यासाठीच रोज एकाच जागेचा उपयोग करतात.
7. झोपण्याच्या व जागण्याच्या वेळा निश्चित असाव्यात; जेणेकरून शरीराचे biolocal clock‘ सेट राहील.
8. चिंता दूर सारून प्रसन्न, आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.
9. झोपण्याचा बिछाना व्यवस्थित अंधारमय खोलीत असावा.
10. नियमित मसाज केल्याने झोप व्यवस्थित येते. किमान झोपण्यापूर्वी चेह-या ची, डोक्याची तेलाने हळुवार मालिश केल्यास झोप येते.
वरील उपाययोजना करूनही निद्रानाश न गेल्यास आयुर्वेदिक पंचकर्मात सांगितलेली शिरोधारा करावी. याने औषधी न घेता कोणत्याही दुष्परिणामांविना मन व डोके शांत होऊन झोप येते. तणाव (depression) दूर होतो. ही अतिशय उपयुक्त प्रक्रिया आहे. आयुर्वेदात काही औषधी योजनाही सांगितलेली आहे. जसे. अश्वगंधा, ब्राह्मी, सर्पगंधा, जटामांसी. या औषधीचे वैशिष्ट्य म्हणजे सवय लागत नाही. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वरील उपाय करून निद्रा - झोप घ्यावी. स्वस्थ, प्रसन्न जीवन जगावे. असे केल्याने आपला व परिवाराचा तणाव दूर होईल. शिरोधाराही घ्या. ही अमृततुल्य उपाययोजना आहे.
gautamjogad@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.