आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेट फोन कॉल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाणे ही नावीन्याची गोष्ट नाही. पूर्वी परदेशी असलेल्या नातेवाइकांशी संपर्क साधणे ही खूपच कठीण आणि खर्चिक बाब होती. आता मात्र फोनच्या एका क्लिकवर तुम्हाला संपर्क साधता येतो.
तुम्ही एकदा इंटरनेटचे कनेक्शन घेतल्यावर तुमच्याकडे अनेक सोयी उपलब्ध होतात. इंटरनेट फोन आणि व्हिडिओ त्यातलीच एक. तुम्ही मोफत सेवा देणा-या कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडरकडे खाते उघडायचे. जसे गुगल टॉक किंवा विंडोज लाइव्ह मेसेंजर. परंतु सध्याचे सर्वात लोकप्रिय आणि उपयुक्त प्रोव्हायडर आहे स्काइप (Skype).
तुमचा संगणक जर अत्याधुनिक असेल तर ही मोफत सॉफ्टवेअर्स तुमच्याकडे असतीलच. जर नसतील तर तुम्ही इंटरनेटवरून डाउनलोड करून घेऊ शकता. ही सर्व सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करायला अतिशय सोपी आहेत. इन्स्टॉल केल्यावर जेव्हा पहिल्यांदा तुम्ही सॉफ्टवेअर चालू करता तेव्हा तुमचा मायक्रोफोन, स्पीकर्स, कॅमेरा व्यवस्थित इन्स्टॉल केले आहेत की नाही ते तपासून पाहाणे योग्य आहे. आता तुम्हाला ज्यांच्याशी बोलायचे आहे त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्या तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अ‍ॅड करू शकता. स्काइपमधून कनेक्ट झाल्यावर तुम्ही फोन किंवा व्हिडिओ दोन्हीवरही बोलू शकता. खबरदारी म्हणून प्रायव्हसी पॉलिसीचे सेटिंग वापरावे ज्यामुळे चुकीचे फोन कॉल्स, मेसेज आणि ई-मेल्स येण्यावर आळा बसेल.
तुम्ही व्हिडिओ, फोन कॉल्स आणि मेसेजिंग एकाच सॉफ्टवेअरमधूनही करू शकता. तुम्ही जर फ्री फोन कॉल इंडिया असा गुगल सर्च केलात तर तुम्हाला अनेक वेबसाइट सापडतील तसेच प्रत्यक्षपणे सांगणारे यूट्यूबवर व्हिडिओही सापडतील. स्काइप सेवेचा लाभ घेऊन तुम्ही देशात आणि परदेशात अगदी कमीत कमी पैसे खर्च करून आप्तांच्या संपर्कात राहू शकता.