इंटरनेट वापरणा-यांसाठी खास / इंटरनेट वापरणा-यांसाठी खास माहिती

दिव्य मराठी

Apr 20,2012 10:20:09 PM IST

सध्याच्या काळात इंटरनेट वापरणा-यांची संख्या जितक्या वेगाने वाढते आहे, तितक्या प्रमाणात हॅकिंगची समस्या वाढते आहे. हॅकिंगमागे असुरक्षित पासवर्ड हेच मोठे कारण आहे. अशा स्थितीत तुम्ही पासवर्डचे महत्त्व नजरेआड करून चालत नाही.
विशेष बाब अशी की, इंटरनेट अकाउंटसाठी पासवर्ड टाकताना बहुतांश युजर्स अशी वाक्ये किंवा आकड्याचा वापर करतात, जी सर्रास प्रचलित असतात, असे पासवर्ड टाकण्याचे टाळले तरच हॅकिंगची समस्या सुटू शकते. इंटरनेट युजर्सनी कधीही आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाचा पासवर्ड बनवू नये. तसेच स्वत:शी संबंधित आकड्याचा पासवर्ड बनवू नका. जसे तुमचा जन्मदिनांक, लग्नाचा वाढदिवस किंवा वाहनाचा क्रमांक वगैरे.
पासवर्ड टाकताना युजर्सनी कॅपिटल आणि स्मॉल अशा दोन्ही शब्दांचा वापर करावा. आपला पासवर्ड बँकेशी संबंधित खात्याच्या क्रमांकाशी नसावा. याशिवाय प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड 20 - 30 दिवसांनंतर बदलत राहिला पाहिजे. आपला पासवर्ड आपल्या जवळच्या व्यक्तीला जरूर सांगून ठेवावा. म्हणजे एखाद्या वेळी पासवर्ड विसरला असल्यास त्यांच्याकडून जाणून घेता येईल.

X
COMMENT