आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवर निर्बंधाच्या हालचाली?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विकीपीडियासमवेत अन्य साइट्स ‘सोपा’ आणि ‘पापा’ हे दोन्ही कायदे कठोर सिद्ध होतील. या कायद्याचे परिवर्तन झाल्यानंतर कोणताही कॉपीराइटर कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप करत, परदेशातील वेबसाइट्स बंद करू शकतो. यामुळे इंटरनेटचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते. या दोन्ही कायद्यास मंजुरी देण्याच्या जोरदार हालचाली अमेरिकेत सुरू झाल्या आहेत. त्यावर चर्चेअंती 24 जानेवारीला सिनेटमध्ये सदस्य मतदान करणार आहेत.
परदेशातील वेबसाइट्सकडून आॅनलाइन नक्कल करण्याच्या प्रकारास अमेरिक न सरकारने गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. त्यावर बंदी घालण्यात यावी या दिशेने प्रयत्नही सुरू आहेत. या हालचालींमुळे विकीपीडियासह हजारो साइट्स तीव्र नाराज आहेत. आपली नाराजी दर्शवण्यासाठी जवळपास 7 हजार वेबसाइट्सनी बंद पाळला. यात अनेक वेबसाइट्सनी आपले वेबपेजेस 24 तासांसाठी ब्लॅकआऊट केले होते.
या वेबसाइट्सनी आपला मार्ग योग्य असल्याचे म्हटले आहे. विकीपीडियासमवेत अनेक वेबसाइट्सचे म्हणणे असे की, अमेरिकन सरकार विकीपीडियासमवेत अन्य साइट्सवर या दोन्ही कायद्यान्वये आॅनलाइन नक्कल करण्यावर बंदी घालण्याची भाषा करत आहे, पण यामुळे इंटरनेटचे स्वातंत्र्य धोक्यात येण्याचे संकेत आहेत. वास्तविकत: विकीपीडियासह अन्य साइट्सचे म्हणणे असे की, ‘सोपा’ आणि ‘पापा’ कठोर कायदे सिद्ध होतील. याचे कायद्यात रूपांतर झाल्यास कोणताही कॉपीराइटधारक आपल्या कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत वेबसाइट बंद करेल.
हाच अंदाज पाहून इनसायक्लोपीडिया, विकीपीडिया बरोबरच सर्च इंजिन गुगलनेही तीव्र विरोध दर्शवला आहे. गुगलने आपल्या लोकांवर एक काळी स्ट्रीप टाकून दिली. त्यात ‘कृपया इंटरनेटवर सेन्सॉरशिप लादू नका’, असा संदेश सरकारला पाठवण्याचा आग्रह केला. अशा मोहिमेद्वारे सर्व वेबपेजेसना ‘ब्लॅक आऊट’ करत देशातील नागरिक विशेषत: तरुणांना जागरूक करण्याचा प्रयत्न होता.
पण अमेरिकन सरकार या निर्णयाने तसूभरही विचलित झालेली नाही. सरकारचे म्हणणे आहे की, वेबसाइट्सकडून आॅनलाइन पायरसी केले जाणे गंभीर आहे. त्याच कारणाने अशा घटनांवर ठोस कारवाईसाठी कडक कायदा करणे जरुरी आहे. तसेच अमेरिकेतील दिग्गज माध्यमेही ‘पापा’साठी वकिली करत आहेत.