साहित्य ज्या अाधारावर उभे अाहे, अशा दुर्मिळ साहित्याला ते एकप्रकारे नवजीवन देण्याचेच काम करत अाहे अाणि काम अवाक् करणारे अाहे.
नाशिकची अनिता जाेशी. दुर्मिळ पाेथ्यांचा अभ्यास करून, अस्ताव्यस्त झालेली त्यांची पाने जुळवून, त्यांचे जतन व्हावे यासाठी अानंदाने झगडते अाहे. केंद्र सरकारच्या एका मिशनसाठी ती भांडारकर प्राच्यविद्यामार्फत नाशिक, नगर अाणि साेलापूर या जिल्ह्यांमध्ये हे पाेथी रजिस्ट्रेशनचे काम करत अाहे.
-पाेथ्यांच्या संदर्भातील एवढे काम तुम्ही करता, यासाठी काही शिक्षण असते का?
-यासाठीसंस्कृत भाषा येणं अत्यंत गरजेचं अाहे. अावड, स्वभावात चिकाटी असणं महत्त्वाचं असतं. भांडारकर प्राच्यविद्या संशाेधन मंडळात पाेथ्या हाताळण्याचं अाणि लखनाै येथे काॅन्जर्वेशनचं ट्रेनिंग मी घेतलं अाहे.
-या संदर्भातकामाला कशी सुरुवात झाली?
-मीएचपीटी काॅलेजमध्ये एक वर्कशाॅप बघितलं हाेतं. मग तेव्हा कळलं की, संस्कृत एम.ए. असलं पाहिजे. मी शिकतंच हाेते. थाेडी अावड निर्माण झाली. २००५मध्ये थाेडी सुरुवात केली. २००७मध्ये खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. पुढे भांडारकरमधील रजिस्ट्रार अाणि क्युरेटर डाॅ. श्रीनंद बापट यांनी खूपच मार्गदर्शन केले.
-सध्याजे काम सुरू अाहे ते नेमकं काय?
-अमेरिकेनेहळदीसाठी पेटंट मागितला हाेता. तेव्हा भारत सरकारला जाग अाली की, अमेरिका अशा बाबींकडेही लक्ष देते. मग अापण अापले दुर्मिळ ग्रंथ का सांभाळू नये. म्हणूनच मग २००३ राष्ट्रीय पांडूलिपी मिशनद्वारे संस्कृती मंत्रालयाच्या माध्यमातून भांडारकर प्राच्यविद्या संशाेधन मंडळामार्फत महाराष्ट्रातील दुर्मिळ साहित्य, त्यात पाेथ्या, हस्तलिखितं यांचं रजिस्ट्रेशन करण्याचं काम सुरू झालं. माझ्याकडे नाशिक, नगर अाणि साेलापूरचं काम सुरू अाहे. अातापर्यंत मी पंचवीस हजार पाेथ्यांचं रजिस्ट्रेशन केलं अाहे.
-पणलाेक तयार हाेतात का?
-खरंतरलाेकांच्या भावना असतात. लाेक राेज ते वाचतात असे नाही, पण अाठवणी, धार्मिक भावना त्यात असतात. त्यांना वाटतं की, सरकार अापल्याकडून हे साहित्य मागून घेणार, पानं गहाळ हाेतील. पण, मग अाम्हाला त्यांना समजावून सांगावे लागते. असे काहीच हाेणार नाही. फक्त अाम्ही पाेथ्यांची पानं लावणं, ते स्वच्छ करणं, त्याचं स्क्रिप्ट लावणं, नाव, लेखनिक, रचनाकार यावर काम करणार अाहाेत. राष्ट्रीयस्तरावर तुमच्याच नावे नाेंद हाेणार अाहे. बरेच जण एेकतात जुन्या लाेकांपुढे खूप कष्ट घ्यावे लागतात.
-अापल्याकडेसंग्रहाचं वैशिष्ट्य काय अाहे?
-अापल्याकडेकाळाच्या संदर्भात शालीवाहन शक याचा प्रभाव अधिक अाहे. उत्तरेकडे मात्र विक्रम संवत्सराचा प्रभाव दिसून येताे. अापल्याकडील दुर्मिळ संग्रहाच्या काळ-वेळाबाबत काहीच माहिती नसते. मग अशा ठिकाणी अनुभव उपयाेगी येताे. प्रत्येकाच्या संग्रहाचं वेगळं वैशिष्ट्य अाहे. भानाेसे गुरुजी, श्रीधरशास्त्री वारे, अंतुशास्त्री गायधनी, गिरीश टकले, साेलापूरचे किरण जाेशी, पुणतांब्याचे लुंपाटकी, धर्माधिकारी अशा प्रत्येकाकडील संग्रहाचे स्वत:चे असे वेगळे वैशिष्ट्य असते.
-यासाठीचीअार्थिक गणितं काय असतात?
-पूर्वीशासनाकडून निधी येत असे. पण, मधल्या काळात सरकार बदललं तेव्हापासून निधी बंद झाला. अाता ज्याला अावड अाहे ताे काम करताे. या साहित्याच्या रजिस्ट्रेशनचे काहीही पैसे घेतले जात नाहीत. अामचं अर्निंग म्हणाल तर अाम्हाला अंशत: मानधन दिलं जातं. पण, सध्या तेदेखील बंद झालं अाहे.
-अाश्चर्यकारकसाहित्य हाती लागत असेल
-पूर्वजांनीखूप विचार करून अनेक चांगल्या गाेष्टी लिहिल्या अाहेत. साेलापूरला मला ‘कर्मविपाक’ मिळालं, पुनर्जन्म अाणि शांतीविषयक त्यात दिले अाहे. वारे गुरुजींचे साहित्य महत्त्वाचे ठरते. मानवसूत्र, कात्यायन सूत्र असे अनेक प्रकार सापडतात. यातील अनेक अडचणी अनुभवातूनच दूर हाेतात.
-याशिवाय अाणखी काय काम सुुरू अाहे?
-याचसंदर्भातच शिलालेख, पुरातन वस्तू त्याचंही काम मी करते. वस्तुसंग्रहालयातील वस्तूंचं डाॅक्युमेंटेशन मी अनेक ठिकाणी केलं अाहे. अाकाशवाणी अाणि हेरिटेज इंडियासाठी कुंभमेळा काळात रिसाेर्स पर्सन काम केले अाहे; पण मुख्य काम दुर्मिळ पाेथ्यांचे अाहे.