आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता केंद्रात मराठी नेत्यांनी राजकीय वजन वापरून अभिजात दर्जा मिळवून द्यावा : पठारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रंगनाथ पठारे यांनी सांगितले, समितीने आपले काम केले आहे. आता राजकीय नेत्यांनी आपले वजन वापरून मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळवून देण्याचे काम केले पाहिजे. राज्यातील अनेक मराठी खासदार दिल्लीत आहेत. काही मंत्रीही आहेत. स्वत: शरद पवार दिल्लीमध्ये असतात. केंद्रीय गृह विभागाच्या मागे लागून मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


राजकीय नेत्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव : - यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून रंगनाथ पठारे म्हणाले, खासदारांनी दबाव आणला तर हे काम लवकर होईल. रंगनाथ पठारे यांचे म्हणणे अत्यंत खरे आहे. आपल्या राजकीय नेत्यांमध्ये इच्छाशक्ती नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. अन्य राज्यांमध्ये भाषा भवन असताना मराठी भाषेची परंपरा प्राचीन असतानाही राज्यात मराठी भाषा भवन नव्हते.


नेत्यावर दबाव आणलाच पाहिजे, विज्ञान व पदव्युत्तर पातळीपर्यंतची पुस्तके मराठीत पाहिजे : रंगनाथ पठारे यांनी मराठी भाषेच्या वैभवाबाबत बोलताना सांगितले की, विज्ञानाची पाठ्यपुस्तके पदव्युत्तर पातळीपर्यंत लिहून घेतली पाहिजेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी
असा उपक्रम विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ स्थापून सुरू केला होता परंतु हे काम पुढे बंद पडले. राजकीय नेते फक्त घोषणाबाजी करतात त्यांच्यावर दबाव आपणच आणला पाहिजे.


वर्तमानपत्रांनीही दबाव आणावा :- म्हणूनच मी म्हटले की, समितीने मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळावा म्हणून प्रचंड श्रम घेऊन अहवाल पुराव्यांसहित तयार करून दिला आहे. आता राज्यातील 48 खासदारांची वैयक्तिक जबाबदारी आहे की त्यांनी मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या खासदारांवर जनतेने विशेषत: वर्तमानपत्रानी दबाव आणला तरच हे काम होईल असेही रंगनाथ पठारे म्हणाले.


रंगनाथ पठारे,
मराठीला अभिजात भाषेच्या दर्जा मिळण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष