आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळख आरोग्यावरील पुस्तकाची: मधुमेहावरील मागदर्शक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘डायबिटीस आणि संपूर्ण उपचार’ हे पुस्तक मधुमेहासंबंधी सर्वाच्या मनातील गुंता हलक्या हाताने सोडवून अथ ते इति मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे. मधुमेहाविषयी सर्वसमावेशक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची व्याप्ती ठरवली आहे. मधुमेह म्हणजे काय? या मुद्द्यापासून प्रारंभ होणा-या या पुस्तकात मधुमेहाचे प्रकार, मधुमेहासाठी उपयुक्त चाचण्या, मधुमेही रुग्णाने घ्यावयाची काळजी, मधुमेह आहारोपचार, मधुमेहातील गुंतागुंत, इन्सुलिन, मधुमेहाचे सोबती, मधुमेह आणि गर्भवती स्त्रिया, मधुमेहासाठी योगोपचार व प्राणायम व मधुमेही रुग्णाला पडणारे प्रश्न ह्या मधुमेहाविषयीचे सर्व पैलू साकल्याने सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक व्यक्तीत एक अवखळ मूल दडलेले असते. त्याला बंधने नको असतात. तुम्ही हे खाऊ नका, असे करू नका, असे म्हटले की मूल बंड करून उठते आणि मग नेमके तेच करायला लागते.

बरेच प्रौढ, वृद्ध मधुमेही घरच्यांची नजर चुकवून गोड खाणारे तुम्हीही पाहिले असतीलच, पण जर हे शास्त्रीय आधार घेऊन ते न खाणे का जरुरी आहे, असे सांत्वन दिले म्हणजे आपोआप आत्मसंयमन वाढायला लागते. केवळ मधुमेही रुग्णांपुरतीच या पुस्तकाची उपयुक्तता मर्यादित नाही तर असे समजले जाते की सामान्य व्यक्तीसाठीही हे आहार व्यायामाचे आचरण आदर्श आहे. या पुस्तकाला केवळ वैज्ञानिक तथ्यांचा जडपणा येऊ नये याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे.


पुस्तकाचे नाव - डायबिटीस आणि संपूर्ण उपचार
लेखक - प्रा. विदुल सुकळीकर, प्रा. अलका पांडे
प्रकाशन - साकेत प्रकाशन, किंमत - 100 रुपये, पृष्ठे - 119