आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण दारू नव्हे विषच घेताय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विषारी दारू
कमी पैशात भरपूर नशा येते म्हणून दारू पितात व हातभट्टीवाल्यांचा धंदा चालतो. हातमजुरी करणाऱ्या लोकांचे शरीर मजबूत असते म्हणून तत्काळ काही दुष्परिणाम दिसत नाहीत. परंतु कालांतराने हे लोक खचून जातात.
मुंबईच्या मालवणी परिसरात १७ जून रोजी विषारी दारूने १०२ लोक मृत्युमुखी पडले, ४० हून अधिक विषारी दारूने बाधित झाले. यापूर्वीही १९९१ मध्ये ग्रांटरोडवरील एका बारमध्ये विषारी दारूने १०० अधिक लोक बाधित झाले. २००४ मध्ये विक्रोळी मुंबई येथे विषारी दारूमुळे ८७ बळी गेले होते, काय आहे ही विषारी दारू पाहूयात....

मिथेनॉल अधिक झाल्यास दारू पिणाऱ्याचा मृत्यू ओढवू शकतो
दारूने मृत्युमुखी पडण्याच्या ज्या घटना घडतात त्या प्रामुख्याने या दारूमध्ये इथेनॉल -मिथेनॉल यासारख्या रासायनिक घटकांच्या असंतुलनामुळे घडतात. दारू तयार करण्यासाठी ही रसायने एकत्र केली जातात. इथेनॉलचे प्रमाण यात जास्त झाल्यास ते मृत्यूस कारणीभूत ठरत नाही मात्र, मिथेनॉल अधिक झाल्यास दारू पिणाऱ्याचा मृत्यू ओढवू शकतो. हे दोन्हीही घटक बाजारामध्ये २० रुपये लिटर दराने सहज उपलब्ध होऊ शकते.

दारू तयार करणारे अडाणी असल्याने मिथेनॉल जास्त पडले की पिणाऱ्यांचे मरणच
तसेच गावठी दारू तयार करणारी मंडळी ही काही सुशिक्षित व प्रशिक्षित नसतात. त्यामुळे त्यांच्याकडून एखाद्यावेळी मिथेनॉल अधिक प्रमाणात टाकल्या गेल्यास दारू पिणाऱ्यांना त्याची बाधा होते. अनेकदा ते मृत्युमुखी पडतात.
विभागानुसार गावठी दारूचे विविध प्रकार
मराठवाडा, गोवा, कोल्हापूर या भागांत ताडापासून ताडी, कोकणात माडापासून माडी, तसेच विदर्भात मोहाच्या फुलांपासून गावठी दारू बनवण्यात येते. अशा हातभट्टीत मिथेनॉल सर्रास मिसळले जाते व त्याचे प्रमाण जास्त झाल्यास मृत्यू होतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी तर नशा व झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या, संपलेल्या बॅटरीची (सेल) पावडर करुन मिसळले जाते.
गावठी दारू टाळाच नसता १० ते १२ वर्षांत अंथरुण धरलेच समजा.

इथेनॉल-मिथेनॉल यासारख्या रासायनिक घटकांच्या असंतुलनामुळे दारू धोकादायक
पुढील स्लाइड्सवर अवश्य पाहा, १० रुपयांत दारूरूपी विष