आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayashree Deshmukh Article About Child Care Taker

सांभाळ गं बाई यशोदे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'योगेश्वरी पाळणाघराच्या आठवलेकाकूंकडे रमलेली मुलं पाहून ती पाळणाघरात आहेत, असे पालकांना वाटतच नाही, इतका मायेचा ओलावा त्यांना मिळतो. अवधूत व्यवहारेसारखा साडेतीन वर्षांचा बाळ त्याच्या आईला सांगतो, 挿तू घरी जा, मी इथेच आठवले आजोबांकडे थांबतो.・पाळणाघरातून मुलांना घरी नेताना पालकांची कसरत होत असते. योगेश्वरीत येणारी प्रत्येक आई निर्धास्त होऊन म्हणते, सांभाळ गं बाई यशोदे आम्हा आधुनिक देवकींची मुलं!'

जय, वेद, सई व जाई या चार मुलांसोबत 2000मध्ये सुरू झालेले योगेश्वरी पाळणाघर 2007 मध्ये रजिस्टर्ड झाले. मुलांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावती जिल्हा बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली असलेल्या इतर पाळणाघरांच्या तुलनेत या पाळणाघराची बातच न्यारी! इथे केवळ नोकरदारांची नव्हे, तर भाजी विके्रते व चौरेनगर झोपडपट्टीतील मजुरांचीही मुले आहेत. अगदी सात महिन्यांच्या बाळापासून चिमुकली या पाळणाघरात आहेत. मुलांच्या शी-शूपासून त्यांच्या अभ्यासापर्यंत सर्व गोष्टींची काळजी इथे घेतली जाते. त्याकडे आठवलेकाकू जातीने लक्ष देतात. अपर्णा विसपुते, मालती राऊत, रंजना देऊळकर हा त्यांचा कर्मचारीवर्गही तितकाच तत्पर आहे. इथे केवळ चिमुकल्यांचे संगोपनच होत नाही, तर जीवनव्यवहार, इंद्रिय शिक्षणातून हसत खेळत शिक्षण देत मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर भर दिला जातो.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा सविस्तर लेख....
(jayashree.deshmukh@dainikbhaskargroup.com)