आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सागरी क्षेत्रात वर्षाला 10 लाख जॉब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील एक तृतीयांश भाग हा पाण्यानेच भरलेला आहे. तथापि प्रवासासाठी समुद्री मार्गांचा अधिक प्रयोग केला जात नाही; पण व्यापारासाठी सर्वात सुगम मार्ग समुद्री मार्गालाच मानले जाते. जगात मालाची ८० टक्के वाहतूक समुद्री मार्गानेच होते. भारतातही बंदरांच्या विकासासाठी जवळपास १५० प्रकल्पांवर काम सुरू आहे. ५ वर्षांत मरीन इंडस्ट्रीत ४० लाख लोकांना प्रत्यक्ष व ६० लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. अशात मरीन इंजिनिअरिंग (सागरी अभियांत्रिकी)च्या विद्यार्थ्यांसाठीही करिअरच्या उत्तम शक्यता आहेत.
भारतात सध्या १२ मोठ्या आणि २०० लहान बंदरे आहेत. २०१५ मध्ये या बंदरांची क्षमता १८०.६ कोटी मेट्रिक टन होती, जी २०१७ मध्ये २४९.३ कोटी मेट्रिक टन होऊ शकेल. कार्गो कॅपॅसिटी वाढविण्यासाठी या बंदरांवर माल वाहतूकदेखील वेगाने वाढत आहे. २०१६ च्या ऑक्टोबरपर्यंतच्या आकड्यांनुसार बंदरांवर मालवाहतूक ६०.६ कोटी मेट्रिक टन होती. ज्याच्या २०१७ च्या अंतापर्यंत ९४.३ कोटी मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार २०१७ पर्यंत भारतात बंदरे वाहतूक २९ टक्के वार्षिक वेगाने वाढेल.

या क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणुकीची मंजुरी होण्याने गुंतवणुकीच्या अजून अधिक शक्यता आहेत. २००१ पासून ते २०१६ च्या दरम्यान भारतातील बंदरे क्षेत्राला जवळपास १.६४ अब्ज डॉलरचे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक मिळाली आहे. वाढत्या बंदर क्षेत्रात नवी जहाजे व त्यांची देखभाल करणारे व्यावसायिकांची मागणी वाढणार आहे. बंदरे क्षेत्राच्या वेगवान विकासाच्या कारणाने मरीन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या काळात उत्तम संधी असू शकतात. मरीन इंजिनिअरिंगमध्ये नॉटिकल आर्किटेक्चर आणि विज्ञानाचाही समावेश आसतो. मरीन इंजिनिअरिंग कोर्समध्ये जहाजे व समुद्री नौकांना बनविणे आणि त्याची दुरुस्ती देखभाल करणे शिकविले जाते. जहाजाच्या देखभालीची जबाबदारी मरीन इंजिनिअरची असते. ते जहाज बनविण्यासाठी आवश्यक यंत्रांच्या निवडीसाठी जबाबदार असतात. ज्यात स्टीम ट्रिब्यून, गॅस टर्बाइन, कंट्रोल सिस्टिम आदी समाविष्ट आहे.

पदवीसह तंदुरुस्तीही आवश्यक
मरीन इंजिनिअर होण्यासाठी मरीन या नॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई वा बीटेक पदवी गरजेची आहे. फिजिक्स, केमिस्ट्री गणितासह बारावी उत्तीर्ण होणारे या मरीन इंजिनिअरिंगच्या बीई वा बीटेक कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. बीई वा बीटेक कोर्समध्ये प्रवेश जेईईच्या गुणाच्या आधारावर मिळतो. काही संस्था स्वत:च्या प्रवेश परीक्षाही घेतात. मरीन इंजिनिअरसाठी शारीरिक तंदुरुस्ती उत्तम हवी. मास्टर डिग्रीत प्रवेशासाठी संबंधित शाखेत बीई वा बीटेक वा एमएस्सीची पदवी आणि गेट परीक्षा स्कोअर आवश्यक असतो. तथापि, हा कोर्स करवणाऱ्या संस्था देशात जास्त नाहीत.

खासगी, सरकारी क्षेत्रांत संधी
मरीन इंजिनिअर सरकारी, खासगी शिपिंग कंपन्यांत जॉब करू शकतात. नेव्ही, इंजिन उत्पादन कंपन्या, शिप बिल्डिंग, डिझायनिंग कंपनी व संशोधन संस्थांत उत्तम जॉब करू शकतात. याशिवाय काही ऑइल आणि गॅस कंपन्यांतही याची चांगली मागणी असते.

पॅकेजदेखील आहे चांगले
या क्षेत्रात फ्रेशरला २५ ते ३० हजार रुपये प्रतिमाहचे सॅलरी पॅकेज मिळू शकते. खासगी संस्थांमध्ये हे आणखी अधिक असू शकते. मास्टर पदवी आणि काही वर्षांच्या अनुभवानंतर सॅलरी पॅकेज ५० ते ६० हजार रुपये प्रतिमाहपर्यंत होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...