आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय हवाईदलाच्या हवामान विभागात महिलांसाठी विशेष संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय हवाईदलाच्या हवामान विभागात महिला उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत -
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार महिलांनी विज्ञान, गणित, सांख्यिकी, भूगोल, संगणक विज्ञान, पर्यावरणशास्त्र, हवामानशास्त्र, कृषी, जीवशास्त्र यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्या शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हव्यात.

वयोगट : 20 ते 25 वर्षे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना वायुदल निवड मंडळातर्फे निवड प्रक्रिया, मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

वेतनश्रेणी व भत्ते : निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय हवाईदलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून दरमहा 15600-39100 या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना हवाईदलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, फायदे व भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध असतील.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 1 ते 7 मार्च 2014च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमून्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॅग नं. 001, नरिमन भवन पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली 110106 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2014.
------------------------------
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटची फेलोशिप
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ येथे उपलब्ध असणार्‍या वन-व्यवस्थापन व संबंधित विषयातील संशोधनपर फेलोशिपसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत -
फेलोशिप अंतर्गत समाविष्ट विषय : या संशोधनपर फेलोशिपसाठी पर्यावरण संरक्षण व व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण - संवाद, अर्थशास्त्र मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान, सामाजिक वनीकरण, वन-व्यवस्थापन व समाजशास्त्र आणि सामाजिक विकास - संवर्धन यासारख्या विषयांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा चार्टर्ड अकाउंटंसी, कॉस्ट अकाउंटंसी अथवा कंपनी सेक्रेटरी विषयक पात्रता पूर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे घेण्यात येणारी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व कॉमन एन्ट्रन्स टेस्टमधील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची फेलोशिपसाठी निवड करण्यात येईल.

फेलोशिपचा कालावधी व तपशील : निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ येथे डॉक्टरलस्तरीय व चार वर्षे कालावधीची फेलोशिप देण्यात येईल. या कालावधीदरम्यान त्यांना पहिली दोन वर्षे दरमहा 12000 रु. व पुढील दोन वर्षांसाठी दरमहा 14000 रु. फेलोशिप देण्यात येईल.

अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 500 रु. चा डायरेक्टर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या नावे असणारा व भोपाळ येथे देय असणारा डिमांडड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : फेलोशिपच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या www.iifm.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज चेअरपर्सन, एफपीएम अ‍ॅडमिशन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, नेहरू नगर, भोपाळ 462003 (मध्य प्रदेश) या पत्त्यावर 2 एप्रिल 2014 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
------------------------------
कम्बाइंड जिओ - सायंटिस्ट अँड जिऑलॉजिस्ट एक्झामिनेशन 2014
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या जिओ सायंटिस्ट व जिओलॉजिस्ट एक्झामिनेशन-2014 या निवड परीक्षेसाठी खालीलप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत -
जागांची संख्या : एकूण उपलब्ध जागांची संख्या 260.

आवश्यक पात्रता : अर्जदारांनी जिऑलॉजिकल सायन्स, जिऑलॉजी, जिओ-एक्स्प्लोरेशन, मिनरल एक्स्प्लोरेशन, इंजिनिअरिंग, ओशनोग्राफी, जिओ-फिजिक्स, फिजिक्स यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : 32 वर्षे. राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.

निवड प्रक्रिया : पात्रताधारक उमेदवारांची मुंबईसह विविध परीक्षा केंद्रांवर 24 मे 2014 रोजी लेखी परीक्षा व त्यानंतर मुलाखत घेऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून 200 रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरावेत.

अधिक माहिती व तपशील : या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या 1 ते 7 मार्च 2014च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाचा www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर पाठविण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2014.
------------------------------
कर्मचारी निवड आयोगाची ज्युनियर इंजिनिअर्स एक्झामिनेशन : 2014
कर्मचारी निवड आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या ज्युनियर इंजिनिअर्स क्वॉलिटी सर्व्हेइंग अँड काँट्रॅक्ट एक्झामिनेशन - 2014 साठी खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत -

आवश्यक पात्रता : उमेदवारांनी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी अथवा पदविका परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : 26 वर्षे. राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड प्रक्रिया : पात्रताधारक उमेदवारांना विविध परीक्षा केंद्रांवर 25 मे 2014 रोजी लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावून त्यांची निवड करण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून 100 रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत भरावेत.
अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 1 ते 7 मार्च 2014च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://ssconline.nic.in अथवा http://ssconline2.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : महाराष्ट्रातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निर्देशक (पश्चिम क्षेत्र) - कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, 101, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-400020 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2014.
------------------------------