आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ जुलै प्लास्टिक सर्जरी डे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्लास्टिकसर्जरीबद्दल अनेक गैरसमज आहेत. प्लास्टिक सर्जरीला फक्त कॉस्मेटिक सर्जरीशी निगडित ठेवले. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, कॉस्मेटिक सर्जरी ही प्लास्टिक सर्जरीची उपशाखा आहे. आतापर्यंत प्रसारमाध्यमांनी प्लास्टिक सर्जरीला फक्त मोहक व्यक्तिमत्त्व प्राप्त करून दिलं आहे. जे लोकांना सुंदर तरुण बनवण्यासाठी मदत करतात.
प्लास्टिक सर्जरीबद्दल अनेक गैरसमज आहेत. प्लास्टिक सर्जरी ही एकमेव वैद्यकीय शाखा आहे. जी कला शरीरातील अवयवाशी किंवा संस्थेशी जोडलेली नाही. ही मूलभूत तत्त्वांवर आधारलेली आहे अॅप्थॅमोलॉजी डोळ्याशी निगडित आहे. ई.एन.टी कान-नाक-घसा शी निगडित आहे. थोरासिस सर्जरी छाती हृदयरोगाशी निगडित आहे. परंतु प्लास्टिक सर्जरी ही डोळ्यापासून पायाच्या बोटापर्यंत पसरलेली आहे. प्लास्टिक सर्जरीला फक्त कॉस्मेटिक सर्जरीशी निगडित ठेवले परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, कॉस्मेटिक सर्जरी ही प्लास्टिक सर्जरीची उपशाखा आहे. आतापर्यंत प्रसारमाध्यमांनी प्लास्टिक सर्जरीला फक्त मोहक व्यक्तिमत्त्व प्राप्त करून दिलं आहे. जे लोकांना सुंदर तरुण बनवण्यासाठी मदत करतात.
भारताचा प्लास्टिक सर्जरीत जगात चौथा क्रमांक लागतो. प्रसारमाध्यमांमध्ये कॉस्मेटिक सर्जरीला खूप प्रसिद्धी मिळते. परंतु रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी प्लास्टिक सर्जरीच्या इतर उपशाखांचे काम जनसामान्यांपर्यंत पोहाेचत नाही. त्याला प्रसिद्धीही मिळत नाही. परंतु उद्याच्या प्लास्टिक सर्जरी डे निमित्त ही माहिती पोहोचवणे मी माझे कर्तव्य मानतो. प्लास्टिक सर्जरी हे नाव ग्रीक शब्द प्लास्टिकॉसपासून निर्मित झालेला आहे याचा अर्थ साचा (मोल्ड) असा होतो.

भारतप्लास्टिक सर्जरीत चौथा
सर्जरीतप्लास्टिकचा वापर होतो
वस्तुस्थिती: प्लास्टिकसर्जरी हा शब्द प्लॉस्टिकॉस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे त्याचा अर्थ सुघटन करणे असा होतो. दररोजच्या वापरातील प्लास्टिकचा या प्लास्टिक सर्जरीशी काही संबंध नाही.

प्लास्टिकसर्जरीनंतर व्रण खुणा नाहीशा होतात
वस्तुस्थिती: प्लास्टिकसर्जरीनंतर व्रण, खुण दिसून येतो. परंतु ती अतिशय लहान, सहजरीत्या दिसणारी असते. प्लास्टिक सर्जनचे यात विशेष प्रावीण्य असते. त्याचबरोबर विविध उपायांमुळे व्रण दिसेनासे होतात.

प्लास्टिकसर्जरी म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी आहे
वस्तुस्थिती: कॉस्मेटिकसर्जरी ही प्लास्टिक सर्जरीची एक उपशाखा आहे. प्लास्टिक सर्जरीत अनेक उपशाखा आहेत जसे हाताची प्लास्टिक सर्जरी (हंॅड सर्जरी) यात हाताचे विविध व्यंग उपघाताच्या शस्त्रक्रिया होतात.

मायक्रोसर्जरी : कर्करोगानंतरकिंवा अपघातानंतर शरीरातील खराब किंवा निकामी झालेल्या भागाची पुननिर्मिती करणे. जसे मांडीच्या मासापासून नवीन जीभ बनवणे. पायाच्या हाडापासून चेहऱ्याचा नवीन जबडा बनवणे. कपाळावरील त्वचेपासून नवीन जबडा बनवणे कपाळावरील त्वचेपासून नवीन नाक बनवणे पूर्णत: तुटलेला अंगठा हात-पाय परत शरीराशी जोडणे.

कॉनियोमॅनिलो फेशियल सर्जरी : चेहऱ्याच्याहाडाची जोडणी करणे कवटीच्या भागाची पुनर्निर्मिती करणे, चेहरा कवटीच्या विविध व्यंगाचे उपचार करणे. प्लास्टिक सर्जरी ही मुख्यत्वे करून अवयवांचे कार्य नियमित करण्यावर भर देते आणि त्यानंतर बाह्य स्वरूपाकडे लक्ष देते.

महागडी,फक्त श्रीमंत, प्रसिद्ध लोकांसाठीच बनलेली आहे
वस्तुस्थिती: बहुतांशप्लास्टिक सर्जरी ही सर्वसामान्यांना परवडणारीच असते. प्लास्टिक सर्जरी करून घेणारे लोक हे सर्वसामान्यच आहेत. कदाचित प्लास्टिक सर्जरीच्या नावाशी प्रसिद्धीचे वलय जोडले गेल्याने प्लास्टिक सर्जरी महाग आहे, असे समजतात.
पूर्णचेहरा बदलता येतो
वस्तुस्थिती: हेविधान संपूर्णपणे मिथ्या नाही काही देशात चेहरा प्रत्यारोपण यशस्वी झाले, दीर्घकालीन परिणामांची अजून उकल झाली नाही. भारतात संपूर्ण चेहरा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नियमित होण्यासाठी एक किंवा दोन दशकांचा कालावधी लागेल. तूर्तास केस, कान, नाक, डोळे हनुवटी यामध्ये प्लास्टिक सर्जरी करून सुधारणा केली जाऊ शकते.
प्लास्टिकसर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी अत्यंत धोकादायक आहे
वस्तुस्थिती: प्लास्टिककॉस्मेटिक सर्जरी यात देखील इतर कोणत्याही सर्जरी इतकाच धोका असतो.

फक्तठराविक सेंटर्स, मोठमोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्येच होते
वस्तुस्थिती: असकाही नाही प्लास्टिक सर्जरी नियमितपणे भारतातील अनेक सरकारी संस्थांमध्ये करण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...