आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyoti Gajbe Article About Sexual Harassment At Workplace

राजीनामा देऊन काय होणार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामाच्या ठिकाणी, बाहेर अशा अनुभवाचा प्रत्येकीला सामना करावा लागतो आणि लागणारच. कारण दुष्प्रवृत्तीची कमी नाही आणि चांगल्यावर मग विश्वास बसत नाही. कदाचित म्हणूनच कुणाची तेवढी हिंमत पणाला लागत नाही. समाज, प्रतिष्ठा, घरपरिवार, सहकारी या सर्वांचा विचार स्वत:पेक्षा भारी पडताना दिसतो. म्हणूनच मनुष्य जीवनात स्वत:पेक्षा समाजाचा हिस्सा अधिक असतो. मग त्या समाजाचे काही उत्तरदायित्व नाही का, हा प्रश्न प्रश्नच वाटतो.
लैंगिक छळ, अश्लील हावभाव, गैरवर्तन, असभ्यता आणि असंस्कृत वागणं आमच्या कुठल्या संस्कारी समाजाचं प्रतिनिधित्व करतंय हे सांगणं महत्त्वाचं वाटतं. एकानं आवाज उठवला तर इतरांचं कर्तव्य आहे की आपणही त्याला ताकद द्यावी. सक्षमीकरण, स्वावलंबन, जनजागृती यात महिलांसोबत पुरुषमंडळीही साथ देतात. असंच कार्यालयात घडलं तर?
एक दिवस आमच्या कार्यालयातील मधू (नाव बदलले) रडतच साहेबांच्या केबिनमधून आली. काही न सांगताच टेरेसवर जाऊन रडत होती. हळूहळू स्टाफमध्ये चर्चा सुरू झाली. मलाही कळलं म्हणून मी तिला समजावण्यासाठी तिच्या केबिनमध्ये गेले. तिच्या सांगण्यावरून कळलं की साहेबांनी दुर्व्यवहार केला. मी तिला तक्रार करण्याचा सल्ला दिला. पण ती तीन दिवसांची रजा टाकून घरी गेली.
मधू विवाहित होती. घरच्यांना घाबरली, त्यांना कळल्यावर प्रतिक्रिया काय असेल असं समजत होती. तीन दिवसांनी परतल्यावर काही बदललं नव्हतं. सर्व कामं चालू होती. फक्त मधू बदलली. त्याचं वागणं विक्षिप्तच होतं. आम्हाला कळत होतं. दुपारच्या जेवणाच्या टेबलवर पूर्ण स्टाफ जमा झाला की रोज एक नवीन गोष्ट असायची, काही त्याला समर्थनही करणारे असायचे. ते आमचेच सहकारी होते. काही आपला सल्ला द्यायचे. म्हणायचे, ‘दुर्लक्ष करायचं. आपल्याला नोकरी करायची. थोडंफार असं सहन करावंच लागतं!’
प्रश्न फक्त महिला कर्मचा-यांचा होता. हे फक्त त्यांच्यासोबतच घडायचं. मेंटल टॉर्चर, हरॅसमेंट याचा कित्येक महिलांना नेहमी त्रास व्हायचा. त्या तणावात असायच्या, पण बोलत कुणीही नव्हतं. आपल्या प्रतिष्ठेला जपणा-या गप्प राहायच्या. मधूही एक त्यातलीच. तीन दिवसांनी परतल्यावर शांत राहायची, एकटीच. जणू तिचाच काही दोष होता. एक दिवस आली आणि तिने सरळ राजीनामा दिला. बस्स, तिचा विषय संपला.
तिने माघार घेतली; कारण त्या व्यक्तीला शिक्षा करण्याचं, तक्रार करण्याचं तिच्यात धाडस नव्हतं. या घटनेनंतरही त्याने त्याचे हे प्रकार पुन्हा सुरूच ठेवले. त्याची तक्रार आधीच केली असती तर त्याची पुन्हा हिंमत झालीच नसती. आजही असं घडणं नवीन नाही. अशा घटना घडतात. घडणारच. पण थांबवणं, चाहूल ओळखून कारवाई करणं ही आमचीच जबाबदारी आहे. गप्प बसण्यात नाही, तर प्रतिकारात स्वाभिमान असतो. फक्त राजीनामा देऊन अडचणी दूर होणार नाहीत.
प्रत्येक वेळेला आपण काम सोडणार का? कारण अन्याय तोपर्यंतच होत असतो जोपर्यंत आम्ही सहन करतो. बघ, आज फक्त मधू नाही, तू स्वत:ही असू शकतेस, असं सांगावं लागतंच.
तू खुद को बदल
तभी तो जमाना बदलेगा
तू बोलेगी, मुंह खोलेगी
तभी तो जमाना बदलेगा।
(हा अनुभव एका शासकीय उच्चपदस्थ अधिकारी महिलेचा आहे.)