आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kailas Bhalekar Articale On Competaitu Examination

स्‍पर्धा परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसेवा मुख्य परीक्षा : विज्ञान-तंत्रज्ञान घटकाची तयारी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन क्र. 4 या पेपरमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान घटकाचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे 150 पैकी 40 प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकावर विचारण्यात येतात. प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. ऊर्जा, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, भारताचे आण्विक धोरण, आपत्ती व्यवस्थापन या उपघटकांचा समावेश विज्ञान-तंत्रज्ञान घटकांतर्गत होतो. प्रश्नांचे स्वरूप खर्‍ या अर्थाने उपयोजित www.isro.org असते. आणि सद्य:स्थितील संदर्भावर मोठ्या प्रमाणात भर असतो. या सर्व उपघटकांचा अभ्यास करताना भारताच्या विज्ञान-तंत्रज्ञान विकासाच्या प्रमुख टप्प्यांची माहिती मिळवावी लागते.या सर्व प्रकारच्या तयारीसाठी आठवी ते दहावी या वर्गाची राज्य पाठ्य पुस्तक महामंडळाची पाठ्यपुस्तके, एनसीईआरटीची आठवी ते दहावी या वर्गाची पाठ्यपुस्तके अभ्यासावी लागतात. विज्ञान-तंत्रज्ञान विकासावर स्पेक्ट्रम आणि टाटा-मॅग्रा-हिल प्रकाशनाची इंग्रजी आणि हिंदीमध्येदेखील पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकाबरोबर ‘इंडिया इयर बुक’ या केंद्र शासनाद्वारे प्रकाशित होणार्‍ या पुस्तकामधील विज्ञान-तंत्रज्ञान विकासातील महत्त्वाच्या घडामोडींचे आकलन खूपच उपयुक्त ठरते. हे पुस्तक दरवर्षी प्रकाशित होत असल्याने अद्ययावत माहिती उपलब्ध होते. क्रोनिकल इयर बुक आणि मनोरमा इयर बुक ही पुस्तकेदेखील इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहेत. या पुस्तकांमध्ये सर्वसाधारणपणे वर्षभरातील विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्‍ट्रातील आणि आंतरराय घडामोडींची तंत्रज्ञान आणि उपयोजन यासहीत माहिती दिलेली असते. उदा. अवकाश तंत्रज्ञान विकास या उपघटकाची तयारी करीत असताना मंगळयानाची महत्त्वाची माहिती मिळवणे गरजेचे असते.
विज्ञान-तंत्रज्ञान घटकाची तयारी करताना इंटरनेटची मदत घेता येते. अवकाश-तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या यंत्रणा, महत्त्वाचे टप्पे, सध्याच्या आणि प्रस्तावित मोहिमा, तंत्रज्ञानातील महत्त्वाचे बदल यासारख्या बाबींची माहिती इस्रोच्या वेबसाइटवर अधिक नेमकेपणाने मिळते. इस्रो या संस्थेशी संलग्न यंत्रणांची लिंकदेखील (Polar Satellite) या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ही माहिती अद्ययावत आणि अधिकृत स्वरूपाची असल्याने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने निश्चितच उपयुक्त ठरते.
अवकाश-तंत्रज्ञान विकास या उपघटकाची तयारी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपाच्या अनुषंगाने करावी लागते. उदा. राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2013 मध्ये भूस्थिर उपग्रह (Geo stationary Satellite) आणि ध्रुवीय उपग्रह ) यामध्ये काय फरक आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास अधिक नेमकेपणाने करावा लागतो. अवकाश-तंत्रज्ञान विकासाशी निगडित महत्त्वाच्या यंत्रणा आणि त्यांची महत्त्वाची कार्ये यांची अचूक माहिती मिळवणेदेखील आवश्यक आहे. उदा. राज्यसेवा मुख्य परीक्षा-2013 मध्ये भारतीय उपग्रह अंतरिक्षमध्ये कोणत्या स्थळावरून प्रक्षेपित करण्यात येतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
भारताचा अणू-ऊर्जा कार्यक्रम यावरदेखील प्रश्न विचारण्यात येतात. अणू-ऊर्जा तंत्रज्ञानातील संकल्पनात्मक आकलनाबरोबरच अणुऊर्जा कार्यक्रमातील महत्त्वाच्या धोरणांची अद्ययावत आणि अचूक संदर्भासह तयारी करावी लागते. उदा. भारत-अमेरिका आण्विक सहकार्य करार आणि या करारातील महत्त्वाच्या तरतुदी यांसारख्या बाबींची तयारी करावी लागते.
अणुऊर्जा क्षेत्रामध्ये राय आणि आंतरराय स्तरावर कार्यरत असणा-या संस्थांची रचना, कार्यपद्धती आणि सद्य:स्थितीतील महत्त्वाची धोरणे या बाबी अभ्यासाव्या लागतात. अर्थातच या यंत्रणांच्या वेबसाइटचे आकलन करून अचूक तयारी करता येते. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडींचे वाचन त्यासाठी उपयुक्त ठरते. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यासंदर्भातील महत्त्वाचे स्तंभ ठरावीक दिवशी प्रसिद्ध होत असतात त्याचीदेखील तयारीसाठी मदत होते.ऊर्जा समस्या, ऊर्जा सुरक्षा, भारतातील ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने, भारतातील ऊर्जा धोरणे, ऊर्जा सुधारणा, पुनर्वीकरण ऊर्जा स्रोतांचा विकास या बाबींची तयारी करावी लागते. त्यासाठी शासनाच्या महत्त्वाच्या विभागांच्या वेबसाइटचा संदर्भ घेता येतो. त्यासंदर्भातील महत्त्वाच्या समित्या आणि या समित्यांच्या शिफारशी याची माहिती उपयुक्त ठरते. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील अद्ययावत आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी राय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची वेबसाइट उपयुक्त ठरेल.विज्ञान-तंत्रज्ञान विकास घटकाची तयारी अशा विविध संदर्भातून केल्यास तयारीची व्याप्ती वाढते आणि यासंदर्भाच्या नेमक्या नोट्स तयार केल्यास अभ्यासाचा नेमकेपणा वाढण्यास मदत होते.