आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाकारण का लग्न मोडावे ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब-याच दिवसांनी आमच्या घरी काका आले होते. मुलीची कोर्टात केस होती त्यामुळे आले होते. मुलीच्या लग्नाला तीन वर्षे झाली, पण मुलीला सुख नाही. लग्न थाटामाटात केलं. मुलगा डीएड, शिक्षक. घरचेही सुशिक्षित. लग्नानंतर सहा महिन्यांतच मुलीला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. सासूने घालूनपाडून बोलणे, नव-याने दुर्लक्ष करणे, अपमानास्पद वागणूक देणे ती सहन करत होती. पण आता दोन महिन्यांपूर्वी तिच्या नव-याने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. त्याने स्वत:च्या एक वर्षाच्या मुलाचाही विचार केला नाही. हे सगळे ऐकून आम्हाला खूप वाईट तर वाटलेच, पण मला रागही आला काकांच्या जावयाचा आणि त्याच्या अशा वर्तनाचा. स्वत: शिक्षक असून, एक वर्षाचं बाळ असून विनाकारण घटस्फोटाची मागणी करतो? याला घटस्फोटच घ्यायचा होता तर लग्न कशाला करायचे? एखाद्या मुलीचे आयुष्य का उद्ध्वस्त करायचे म्हणते मी. मुलगी सुंदर आहे, सुशिक्षित आहे.
तिचेही डीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. भविष्यात तिलाही चांगली नोकरी मिळू शकते. हा नक्की माणूसच आहे का, असा प्रश्न पडतो. कारण एक सुशिक्षित शिक्षक जो मुलांना घडवण्याचे, सुजाण नागरिक बनवण्याचे काम करतो, तो घरामध्ये असे वागतो म्हटल्यावर खरोखरच तो शिक्षक म्हणवून घेण्याच्या लायकीचा आहे का,असे वाटते. जो स्वत:चे भवितव्य व्यवस्थित घडवू शकत नाही, तो मुलांचे भविष्य काय घडवणार? ज्या मुलीसोबत त्याने समाजासमोर लग्न केले, त्याच मुलीला आज तो वेडी ठरवतोय, त्रास देऊन पैशाच्या जोरावर घटस्फोट मागतोय. या सर्वच गोष्टींचा मी एक मुलगी म्हणून विचार केला तर खूप दु:ख वाटते. कारण मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर आईवडील तिला वाढवतात, जगण्याचे बळ देतात आणि लग्नाचे वय झाले की वडील जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी व कर्तव्य पार पाडण्यासाठी मुलीला चांगला नवरा मुलगा शोधून तिचे लग्न लावून देतात. काकांनी त्यांच्या बाकीच्या तीन मुलींची लग्न करायची की नाही? कारण पहिल्याच मुलीचे असे झाले तर राहिलेल्या मुलींचे भवितव्य काय असेल?