आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना थोडा वेळ द्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पल्या सर्वांनाच गौतम बुद्धांची गोष्ट माहीत आहे. आपल्या मुलाला कधीच कोणतीच वाईट गोष्ट, दु:ख बघायला लागू नये म्हणून या राजपुत्राचे आईवडील खूप काळजी घेतात. त्याच्या अवतीभवती कायम चांगलंच चित्र ठेवतात. मुलगा मोठा होतो. एके दिवशी बाहेर पडतो. समाजाचं दु:खी चित्र दिसतं. हे भयानक वास्तव तो पचवू शकत नाही. त्याला विरक्ती येते आणि तो गौतम बुद्ध होतो. सांपत्तिक स्थिती चांगली असलेल्या घरांमधील तरुण मुलं आत्महत्या करतात, त्याविषयीच्या बातम्या वाचताना ही गोष्ट आठवते. 


कुणी गेममध्ये हरलं म्हणून, कुणी नकार दिला म्हणून, कुणी फेसबुकवर लाइक्स नाही मिळाल्या म्हणून तर कुणी मार्क कमी पडले म्हणून. या यादीला अंत नाही. आणि यात अगदी पाचवीच्या मुलाचाही समावेश आहे. यात दोष कुणाचा? मानसिकतेचा. पण मग मानसिकता म्हणजे काय? तर ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. 


कुणाची मानसिकता चुकीची आहे. पूर्णपणे पालक दोषी का? व्यवस्था दोषी का? तंत्रज्ञान दोषी का? तर सर्वांचीच थोडी थोडी चूक आहे, असं वाटतं. आपण या सगळ्यांच्याच मानसिकतेत थोडा थोडा बदल करायला हवा. कसं ते पालकांनीच ठरवावं, कारण ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. आपल्या मुलाला काय आणि कसं झेपेल, ते त्यांनी ठरवावं. 


आपण शरीराचं हायजिन पाळतो मग मनाचं का नाही? 
उद्या तू मोठा झाला/लीस की ज्यांच्याकडे काही नाही, अशा मूठभर तरी लोकांना तुला घडवायचं आहे, ही जिद्द त्यांच्या मनात जागवा. त्यांच्या विचारचक्राला योग्य दिशा द्या. कॉम्प्युटरमुळे त्यांच्या समोर एक आभासी पडदा निर्माण झाला आहे. हा पडदा बाजूला करून वास्तव त्यांच्या समोर ठेवा.  यासाठी गरज आहे थोडा वेळ द्यायची.

- कौमुदी परांजपे, नाशिक 

बातम्या आणखी आहेत...