आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kavita Darak Article About Facing Tough Situation

आता माझी सटकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूरमधील लग्न आटोपून आम्ही उज्जैनला जाण्याचे ठरवले. मी, आई, दोन मावशा व 12 वर्षांचा मावसभाऊ. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सकाळी आठ वाजता पोचलो तर सगळीकडे शांतता. फलाटावर कुणीच दिसेना. सामान उतरवून मी विचारले, ‘क्या हुआ, सब कूली बैठे हैं?’ ‘मॅडम, कल नक्सलवादियोंने नेता को मार डाला, आज उज्जैन बंद है.’ ऐकताच पायाखालची जमीन सरकली, आता काय करायचे?
मनात आले सामान क्लॉक रूममध्ये ठेवू. मी तिथे गेले, चौकशी केली. उत्तर मिळाले, ‘हर सामान को लॉक लगेगा, खाने का सामान नहीं रखा जायेगा!’ त्याला धन्यवाद सांगून मी परत आले. आता ऑटोवाल्याला सांगून सामान बाहेर आणावं म्हणून मी मावशीला घेऊन बाहेर आले. बाहेर 200-250 लोक बसलेले होते.
समोर ऑटो आणि टॅक्सीवाले होते. मी एकाला विचारले, ‘भाईसाहब, किसी होटल में ले चलोगे? हाटल में रूम तो मिलेगा?’ ‘हां चलो,’ तो म्हणाला, ‘आप घूमने आये हैं तो ले चलता हूं. कितने लोग हो?’ ‘पांच.’ ‘1,000 रुपये होंगे.’ ‘ज्यादा है, 800 दूंगी.’ ‘ये लो कार्ड. ये सारी जगह दिखा दूंगा, गाडी लाता हंू.’ तो गेला, मी दुस-याला विचारले, त्याने 600 रुपये सांगितले.
आता तो आला की त्याला 500 सांगणार. तो ऑटो घेऊन आला, ‘ही काय ऑटो?’ गाडी म्हणजे ऑटो, ही पहिलीच वेळ होती. ‘इतना सामान, पांच लोग कहां बैठेंगे?’ ‘हम तो गाडी इसी को बोलता है, सामान क्लोक रूम में रखो और चलो,’ तो म्हणाला. ‘नहीं, हम टॅक्सी से जायेंगे.’ मी टॅक्सीवाल्याकडे गेले, ‘भाई घूमने ले चलोगे?’ ‘नहीं मॅडम, आज नहीं, सुबह दो गाडी के काच फोड डाले हैं, एक गाडी जला दी, ऑटो से चले जाओ!’
परत येताना ऑटोवाला म्हणाला, ‘800 में ले चलता, कम नहीं होगा.’ मी त्याला 500 सांगितले, तो नाही म्हणाला. आता तो निवांत मित्रांबरोबर पाय-यांवर बसला होता, त्याची युनियन होती, सगळे दिसायला मवाली होते. मी स्टेशनच्या आत आले. सामान बाहेर आणण्यासाठी शेजारी पडलेली हातगाडी घेतली, सामान ठेवले, ढकलत बाहेर आणायला लागले. आता सर्वजण आमच्याकडे बघायला लागले. एका मुलीला असे सामान आणत बघायची ही सर्वांची पहिलीच वेळ होती. ‘लडकी हिम्मतवाली है,’ आपापसात बोलत होते. हे पाहून समोरून हातगाडी घेऊन येणा-या मुलाला त्या ऑटोवाल्याने इशारा केला. तो मुलगा मला म्हणाला, ‘मॅडम, गाडी पीछे लो, मुझे जाना है. गाडी कहां से ली? वापस रखो!’
आता माझी सटकली. हेच माझ्या रागाचे सीमोल्लंघन होते. मी सहनशीलतेची सीमा ओलांडायचे ठरवले, ‘तेरी है? घर से लाया है? सामने से हट. मारा जायेगा. सामान नहीं दिखता? यहीं रख जाऊंगी, क्या बिगाड लेगा?’ मी त्याच्या गाडीला टक्कर दिली. तो घाबरला, गुपचूप बाजूला थांबला. सामान उतरवायला एका ऑटोवाल्याला विचारले, तो नाही म्हणाला. कारण त्या ऑटोवाल्याने सांगितले, यांना घेऊन जायचे नाही. आता प्रत्येक जण नाही म्हणत होता, कारण युनियन. ‘देखो देखो कोई मिलता है क्या, कोई नहीं जायेगा,’ तो जोराने बोलला. ‘तेरे सामने ऑटो करके जाऊंगी वो भी 500 रुपये में. तेरे जैसे 36 आते 72 जाते, क्या बिगाड लेगा? तेरे बाप की ताकत है तो रोक लेना,’ मीपण जोराने बोलले. वातावरण शांत झाले. सगळे माझ्याकडे बघत राहिले. एक जण आला आणि म्हणाला, ‘शाबास, दिखने में दुबलीपतली हो, पर हिंमतवाली हो. बहोत अच्छे बेटा, ऐसे ही बोलना चाहिये.’
तेवढ्यात एक ऑटो आला, ‘कहां जाना है?’ ‘कहीं नहीं, तुम तोल मोल करोगे, फिर सामनेवाला आदमी तुम्हे नहीं बोलेगा ओर तुम नहीं चलोगे.’ ‘क्या हुआ, मॅडम?’ मी त्याला सर्व सांगितले. तो म्हणाला, ‘चलो मॅडम, चलूंगा. मेरे बच्चे हैं, घर है, दूसरे का सुनूंगा तो खायेंगे क्या?’ मी सामान ठेवलं, सगळे बसले. त्या ऑटोवाल्याला मी बोट दाखवून म्हणाले, ‘जा रही हूँ तेरे सामने 500 में, क्या उखडा लिया तूने? रोक सकता है तो रोक ले.’ सगळे लोक माझ्याकडे बघून माझे कौतुक करायला लागले, माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. मी ऑटोत बसले, जणू लढा जिंकला. सुटकेचा नि:श्वास टाकला, घरच्यांना धन्यवाद दिले. कारण मधे बोलू नका हे मी त्यांना सांगितले होते व ते काहीच बोलले नाहीत. बोलले असते तर आम्ही आपापसात भांडलो असतो.
‘बहनजी, आप बहोत समजदार और होशियार हो,’ ऑटोवाला म्हणाला. ‘आप भी कम नहीं, युनियन के खिलाफ जाकर हमे ले जा रहे हो.’ सगळे हसायला लागले.