आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीच्ती चावट्ट पौर्णिमा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रभ्या डोकं धरून बस्ला होता. दिवसभर फिरफिरून त्याच्या तंगड्या तर दुखू लागल्याच होत्या, पण डोकंही दुखू लागलं होतं. त्यात बॉसबाईंनी भुक्कड विनोदाच्या नावाखाली ऐकवलं होतं की, “गुडघे दुखताहेत, असं एकत्रच सांगितलंस तरी चालेल प्रभंजनकुमार! पाय आणि डोकं असं दोन-दोन कशाला वेगळं सांगायचं?”
पुर्षांना खिजवण्यात काय आसुरी आनंद मिळतो या बायकांना देव जाणे.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी हे ‘वटपौर्णिमा कव्हर करण्याचं’ त्रांगडं त्याच्या गळ्यात बांधलं, तेव्हाच त्याची सटकली होती. काय दरवर्षी तेच्ते? पण दुसरं काही विशेष घडलंही नाही दिवसभरात आणि शोधताही आलं नाही, तर नाविलाज को क्या विलाज? खरंतर टीव्हीवरच्या प्रत्येक मालिकेत इकडून ना तिकडून, अशी ना तशी वटपौर्णिमा येतेच. सण म्हणजे मालिकावाल्यांची तीन एपिसोडची बेगमी. त्यात अजून पाणी घालायचं असेल, तर एक सण एक आठवडाही चालू शकतो नं भौ. दोन सवतींमधली खरी पतिव्रता कोण? दोघींपैकी पूजेची शर्यत कोण जिंकतं? त्यांना काय-काय अडथळे येतील किंवा त्या एकमेकींना वा त्यांचे पंटर दुसरीला काय अडथळे आणतील? यांना पतिव्रताच्या परीक्षेला बसवून नवरोबा सोफ्यावर किंवा सिंहासनावर बसलेले निवांत की, यातली कोण पूजा करून धावत येईल आपले पाय धुऊन पायांचं तीर्थ घ्यायला! याक्!! किंवा मग सासरा सुनांना वटपौर्णिमेचं महत्त्व सांगतोय आणि त्या भक्तिभावानं ऐकताहेत. त्यांचे नवरेही, आज मीपण तुझ्यासोबत उपास करणार गडे, असा लाडिक हट्ट धरताहेत आणि बायका कृतकृत्य होताहेत. किंवा मग सामाजिक भानवाल्यांना पर्यावरणाचे धडे देता येताहेत पब्लिकला. वडाचं झाड लावूया, ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचूया… असे डायलॉग हीरो मारतो आणि हिरॉइन लगेच ऑक्सिजन मिळून ऑरगॅझम मिळाल्यासारखा चेहरा करते.
प्रभ्याची कटकट आयकून येकीकडं सायली वैतागली होतीच, दुसरीकडं तिच्या सासूनं डाव साधला होत्ता… “दुसऱ्या जातीतली लग्न करून आणली, तव्वाच वाटलं होतं की, ही कसली वड पूजणार?” आता जातीचा आणि झाडाचा काय संबंध? पण संधी मिळाली की, जात काढलीच पाह्यजे. जातीतली असती तरी प्रभ्याच्या आईनं दुसरा डायलॉग शोधला असता… “आजकालच्या शिकलेल्या पोरी स्वतःला उगीच शाण्या समजतात. साधं देवाधर्माचं माहीत नसतं. नवऱ्याला नोकरासारखं अरेतुरे काय करतात! नोकरीला लागून कमवायला लागल्या की आपले हात पार आभाळाला पोहोचले आसं वाटतं यायना. यांना भायेर यारधगड भेटत आसणार, मग कशाला नवरा लागतो? याच जन्मात लागत नाई, तर सात जन्मांसाठी कोण मागणार?”
त्यात शेजारणींची गंमतजंमत सुरू झाली.
आस्मिता टीचर म्हणली, “जावन्दे गं! त्येवढंच नटायला मिळ्तं. तू नऊवारी नेस आणि नथ घाल सिरीयलमधल्यावानी. मला साडीच नेसावी लागेल, शाळेत जायचंय ना तिकडूनच. पण जरीची नेसणार मी.”
रेखा म्हणाली, “खरंच चल. मस्तपैकी जाऊ. येताना वडापावच्या स्टॉलवरून वडे बांधून घेऊ. मग सिनेमाला जाऊन बसू झक्कास. घरी येऊन हयेच साबुदाणा आन् भगर.”
तेवढ्यात अमृतानं बॉम्ब फोडला, “तुम्ही बसा हित्तंच चर्चा करत. थिकडं ती पौर्णिमा दोनदा दोन वायल्या वायल्या वडांना जाऊन आली, दोन साड्या बदलून. दागिने पण दोन्दा बदलले तिनं. आणि तिसऱ्यांदा आपल्यासोबत येणार म्हण्तेय?”
“पयल्या नवऱ्यासाठी येकदा, दुसऱ्यासाठी येकदा, हे समजलं… पण आता तिसऱ्यांदा कशाला बाई?” रेखानं विच्चारलं.
“तिसरा तरी चांगला मिळू दे म्हणून!” चावट्ट पौर्णिमानं एंट्री मारत स्वतःच खुलासा क्येला.
“पण दोघांचं काय ते मला कळ्लं नाई बघ. म्हणजे पह्यले सात जन्म पह्यला नवरा, दुसरे सात जन्म दुसरा नवरा… आसं? आणि ह्ये तिसऱ्या काल्पनिक नवऱ्याचे त्याच्या फुडचे सात जन्म. म्हणजे येकवीस जन्मांची तरतूद करून ऱ्हायली का काय तू?” सायलीनं विच्चारलंच.
“नाय गो, तसं नाई काई… प्रत्येक जन्मात ह्ये तिघं आलटून-पालटून…!” चावट्ट पौर्णिमा खिदळत म्हणली.
kavita.mahajan2008
Quote Placeholder
@gmail.com