आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅल्शियममुळे किडनीस्टोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला असे वाटत असेल की, किडनी स्टोन ही समस्या केवळ प्रौढांतच आढळत असते. पण हे तितकं खरं नाही. कारण लहान मुलातही किडनी स्टोन (मुतखडे) होतात. किडनी स्टोन झालेल्या बहुतांश मुलांत मुतखड्याच्या समस्येसोबत एखादा आजार दडलेला असतो. उदा. किडनीचे आजार किंवा इतर चयापचयाचे आजार (metabolic disordevs) ते मूलगामी आजार शोधण्यासाठी काही चाचण्याही कराव्या लागतात. यातील बरेच खडे आपोआप लघवीद्वारे बाहेर पडतात. मात्र, कधी कधी अशा किडनी स्टोनसाठी उपचार करावे लागतात.

किडनी स्टोन हे मूत्रमार्गात कुठेतरी गोळा झालेले स्फटिकासारखे पदार्थ असतात. शरीरातल्या मूत्रमार्गात, रक्ताची गाळणी करणा-या अन् लघवी निर्माण करणा-या किडनी या अवयवाचा, किडनीतून लघवी मूत्राशयात (bladder) वाहून नेणा-या युरेटर (ureters) नावाच्या नलिका, लघवी साठवून ठेवणा-या अन् शरीराबाहेर टाकणा-या मूत्राशयाचा, मूत्राशयातून लघवी बाहेर टाकणा-या युरेथ्रा (urethra) या नलिकेचा समावेश असतो.
मूत्रमार्गात आढळून येणारे हे खडे कॅल्शियमसारख्या वेगवेगळ्या द्रवापासून बनलेले असतात. लघवीत असणारे प्रमाणाबहेरचे अस्तित्व, मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग, मूत्रमार्गावर झालेली एखादी शस्त्रक्रिया यामुळे किंवा हे घटक किडनी स्टोन निर्माण होण्यास हातभार लावतात. ब-याचदा किडनी स्टोन होण्यासाठी आनुवंशिकताही कारणीभूत ठरते. म्हणजेच वडिलांना स्टोनचा त्रास असेल तर मुलांनाही स्टोन होण्याची शक्यता असते. मुलाला जर किडनी स्टोन असतील तर डॉक्टर किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरलेला आजार शोधण्यासाठीच्या चाचण्या सुचवतात.
अशा बालरुग्णातले किडनी स्टोन आपोआप लघवीतून बाहेर फेकले जातात. कधी कधी किडनी स्टोनला विशेष उपचार करण्याची गरज असते. योग्य उपचारांनी, त्यानंतर केलेल्या पाठपुराव्यांनी बहुतांशी मुलांतल्या किडनी स्टोनच्या या समस्येचं कुठल्या गुंतागुंतीशिवाय निराकरण होतं.

लक्षणे : किडनी स्टोनची भिन्न लक्षणे मुलात आढळतात. त्यात
* लघवीतून रक्त जाणे - कधी कधी मुलांच्या लघवीत रक्त दिसते. लाल रंगाची लघवी होते, तर कधी लघवीतलं रक्त उघड्या डोळ्यांना दिसून येत नाही. लघवी तपासल्यावर त्यात रक्त असल्याचे दिसून येते. रक्त असण्याच्या या दुस-या प्रकारात मात्र किडनी स्टोनसोबत दुसरा एखादा आजार असण्याची शक्यता अधिक असते.
* पोट दुखणे - मूत्रमार्गात मुतखड्याचं स्थान कुठे आहे त्यानुसार पोटात दुखण्याची जागा ठरते. पोटाच्या एका बाजूला ओटीपोटात किंवा जननेंद्रियाच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे वेदना होत असतात. या वेदनेला senal colic c असे म्हणतात. अशा प्रकारच्या वेदना या कमी जास्त होत असतात. कधी दुखते तर कधी दुखत नाही.
* किडनी स्टोनच्या मूत्रमार्गातल्या स्थानानुसार लघवी करताना त्रास होतो- मुलाला लघवी करण्याची इच्छा होते, मात्र लघवीला बसल्यावर लघवी बाहेर पडत नाही. पण हे लक्षण म्हणजे मुलाच्या लघवीतून स्टोन बाहेर पडत असल्याचे द्योतक असते.
*मुलाच्या लघवीतून रेव किंवा वाळूसारखे लहान लहान खडे बाहेर पडतात. हे लक्षणही मुतखडे लघवीद्वारे बाहेर पडत असल्याचे चिन्ह असते.
कारणे :
* चयापचयाचे आजार (metabolic abnormalities)
मुलात किडनी स्टोन होण्यास चयापचयाचे आजार हे सर्वात जास्त कारणीभूत ठरणारे एक कारण आहे. अशा चयापचयाच्या विकृतीत नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात कॅल्शियमसारख्या खनिजाचे, हार्मोन्सची एन्झाइमची (शरीरात निर्माण होणारे द्रव) किंवा इतर रासायनिक पदार्थांची निर्मिती होत असते.
लघवीतले वाढलेले कॅल्शियमचे प्रमाण (hyper calciurzia) हे एक नेहमी आढळणारे किडनी स्टोनचे एक कारण. शरीरातल्या आतड्यात (intestines) कॅल्शियमचे अधिक शोषण झाल्याने किंवा किडनीत कॅल्शियमचे अधिक शोषण झाल्याने लघवीतले कॅल्शियमचे प्रमाण वाढते.
ऑक्झॅलेटचे (oxalate) वाढते प्रमाण- जर मुलं हिरव्या पालेभाज्या उदा. पालक खात असेल किंवा त्याच्या आहारात व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असेल तर किडनी स्टोनचा त्रास संभवतो. आतड्याच्या काही आजारातून प्रमाणाबाहेर ऑक्सॅलेट शोषले जाते किंवा शरीरात ऑक्झॅलेटची प्रमाणाबाहेर निर्मिती हाते असेल तर अर्थातच त्याचे प्रमाण वाढते.
किडनी किंवा मूत्रमार्गाच्या समस्या : यामध्ये किडनी स्टोनचा धोका अधिक असतो. काही विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंच्या संसर्गामुळे होणारे मूत्रमार्गाचे वारंवार संसर्ग मूत्रमार्गावर झालेल्या शस्त्रक्रिया या किडनी स्टोनचा धोका अधिक वाढवतात.
cystic fibrosis (या आनुवंशिक आजारास फुप्फुसे व पचन समस्या उद्भवतात) किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरतात.
स्टेरॉइड किंवा फ्युरोसेमाइडसारख्या लघवी वाढवणा-या औषधीचे सेवन किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढवते. ब-याचदा किडनी स्टोन का होतात याचं निश्चित कारण आढळून येत नाही.

गुंतागुंती :
मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग (urin tract infections)
मूत्रपिंडाला इजा (kidney damage) किंवा किडनी स्टोनला कारणीभूत ठरणा-या त्या विशिष्ट आजाराच्या गुंतागुंती.
मात्र, योग्य उपचारांनी किडनी स्टोनशी संबंधित वरील गंभीर गुंतागुंती टाळता येतात.
मुलांना किडनी स्टोनचा धोका कशामुळे?
आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा वाजवीपेक्षा अधिक समावेश असणे, त्याचबरोबर ज्यात ऑक्झॅलेट जास्त प्रमाणात आहे. त्या अन्नपदार्थाचे सेवन केल्यास किंवा व्हिटॅमिन सी चे अतिरिक्त मात्रेत सेवन केल्यास मुलांना हा धोका संभवतो.
किडनी स्टोनचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांत जास्त प्रमाणात आढळते. जर कुटुंबातल्या सदस्यांना किडनी स्टोन्स असतील तर मुलांना ते होण्याची शक्यता अधिक असते.
दीर्घकाळासाठी जर मुलं जागच्या जागी खिळवून ठेवलेली असतील किंवा बेडरेस्ट घेत असतील तर लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण वाढून मुलांना हा धोका संभवतो.
प्रतिबंध :
किडनी स्टोन होण्याच्या कारणानुसार त्याचा प्रतिबंध कसा करायचा हे ठरते. किडनी स्टोन टाळण्यासाठी खालील प्रतिबंधात्मक उपाय आहेत. मुलांना अधिक प्रमाणात पाणी किंवा पातळ पदार्थ द्यावेत. आहार नियोजन असावे.
उपचार : किडनी स्टोनवरचे उपचार हे मुतखड्याचा आकार, त्याचे मूत्रमार्गात असणारे स्थान अन् स्टोन कशामुळे निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळे जर लघवी बाहेर पडण्याला अडथळा येत असेल किंवा जंतुसंसर्ग होत असेल, या बाबींनुसार निश्चित केले जातात.उपचार करताना खालील पर्याय निवडले जातात. बरेच लहान लहान खडे मुलांच्या लघवीतून बाहेर टाकले जातात. लहान मुलांत अशा प्रकारचे स्टोन आपोआप बाहेर पडण्याची शक्यता तशी कमी असते अन् त्यांचं बाहेर पडणं हे अत्यंत वेदनादायी असतं. इंडोस्कोपी उपचार पद्धतीत इंडोस्कोप युरेथ्रामधून मूत्रमार्गात टाकून लहानशा शस्त्रक्रियेद्वारे हे स्टोन्स काढले जातात.
लिथोट्रिप्सी- लेझर किंवा ध्वनीलहरीचा उपयोग करून लिथोट्रिप्सीत शरीरातले हे स्टोन फोडले जातात अन् मग त्याचे लहान लहान तुकडे लघवीद्वारे शरीराबाहेर पडतात. क्वचित प्रसंगीच शस्त्रक्रिया करावी लागते.
किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरणा-या आजारावर नेमके इलाज केल्याने मुतखडे निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते.
आहार नियोजन : कॅल्शियमच्या आधिक्यामुळे जर असे स्टोन उद्भवत असतील तर आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी करून आपण त्यावर इलाज करू शकतो. पण हे करताना मुलांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण नॉर्मल पातळीत ठेवण्याकडे कटाक्ष असतो.
औषधी : मुतखड्यास कारणीभूत ठरणा-या मूळ आजारावर प्रभावी इलाज करावे लागतात. उदा. युरिक अ‍ॅसिडपासून बनणारे मुतखडे होऊ नयेत यासाठी ं’’ङ्मस्र४१्रल्लङ्म’ नावाचे औषध सुरू करण्यात येते. किडनी स्टोन असणा-या मुलांना लघवी करताना जर वेदना होत असतील किंवा लघवीत रक्त येत असेल तर त्वरित डॉक्टरी सल्ला घेणे क्रमप्राप्त ठरते.

dr.sanjayjanwale@rediffmail.com