आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योग सांभाळताना जरा आरोग्यही जपा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझे एक क्लाइंट, मोठे उद्योगपती. त्यांचा उद्योग अनेक राज्यांत व देशात पसरलेला. लहान उद्योगापासून सुरुवात झालेली. पुढे शाखा, विस्तारित शाखा अगदी बाहेरच्या देशातही वाढत गेल्या. कामाच्या वेळा हल्ली १२-१४ तासांपेक्षा कमी होत नाहीत. सुटीच्या दिवशीही मोबाइलवर आॅफिसमध्ये असल्यासारखेच अडचणी सोडविणे चालूच असते. तेही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असताना कारण काही गोष्टी मालकाला स्वत: कराव्या लागतात. अनेक निर्णय नुकसानदायी असतात तरीही वेळेत आॅर्डर्स पूर्ण करणे महत्त्वाचे असते. ताणतणावात वावरणारे हे माझे क्लाइंट. त्यांच्या फॅिमली फिजशिियनच्या आग्रहामुळे मला भेटायला बाहेरगावाहून बराच मोठा प्रवास करून आले. माणूस अगदी परफेक्शनिस्ट. अशा व्यक्तींना स्ट्रेस जास्त असतो. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी असायला हवी, असा कटाक्ष. माणसे काम करणार म्हटल्यावर चुका या होणारच. झीराे डिफेक्ट संकल्पनेवर हल्ली सगळे औद्योगकि क्षेत्र चालत असते. संगणकीय, आॅटोमेशनमुळे क्वाॅलिटी सििस्टम्स आणणे शक्य असते. शेवटी माणसाचा रोलही असतोच कुठे ना कुठे. मला अगदी पहिल्याच भेटीत एकेरी बोलणारा आणि तरीही मला आवडलेला हा एकमेव क्लाइंट.

मला म्हणाले, अरे या वजनाचे काहीतरी करायला पाहिजे. बघ काय झालंय माझ्या पोटाचं. अरे मी काॅलेजात असताना किती हॅन्डसम होतो हे आता सांगावं लागतंय, वगैरे वगैरे. हे सांगतानाही त्यांची चुळबुळ सुरूच होती. त्यांचे रिपोर्टस जवळपास नॉर्मल होते, पण तरीही ते नॉर्मल नाहीत हे माझ्या लक्षात आले होते. मी त्यांना म्हणालो, सर, तुम्ही सगळं फॉलो करणार ना मी सांगितलेलं? ते ताडकन उत्तरले, बघितलंस ना, माझा व्याप किती मोठा आहे. अरे अजिबात वेळ नसतो. काही करायला सांगू नकोस. आज थोडा वेळ काढून आलोय. मी त्यांचे आभार मानले. कारण त्यांच्या वेळेशिवाय माझी काॅन्सेप्ट मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो नसतो. मी त्यांचे बीएमआय, बीएमआर, सेगमेंटल फॅट्स व मसल्स इत्यादींसोबत व्हिसरल फॅट्स तपासले. व्हिसरल फॅट्स दुप्पट होते आणि तेच त्यांच्या येण्याचे मुख्य कारण होते. पोटाचा नगारा झाला होता. मात्र तरीही त्यांचा उत्साह कमी नव्हता. हेच कदाचित त्यांच्या यशाचे रहस्य होते. पन्नाशीत राहून काय वेगळे यश हवे असते? बरोबरीने वाढलेला ताण आणि फॅट्स कमी करणे माझ्यापुढे आव्हान होते. न्यूट्रशिन, व्यायामाचेही प्लान त्यांना आवडले. फक्त त्यांच्या डाएट प्लानमध्ये दुपारनंतर पाचच्या सुमारास थोडे खाण्याचे सुचविले होते. ते वाचून ते ख्ूपच िचडले. मला इंग्रजीत म्हणाले, कशिोर तुला माहीत आहे का, या वेळी मी मीटिंग्जमध्ये किती व्यस्त असतो. मला ते शक्य नाही. मी त्यांना शांतपणे विचारले, तुम्ही या वेळी अगदी टाॅयलेटलाही जात नसाल ना? ते म्हणाले, हो, का? मग मी त्यांना सांगितले की मी तुम्हाला खाण्यासाठी सांगतोय, त्यासाठी पाचच िमनिटे लागणार आहेत. मीटिंग हाॅलमधून उठा, अ‍ॅन्टीचेंबरमध्ये जा आणि खा. एवढा स्टाफ आहे तुमचा, सहज मॅनेज होईल. आता मात्र ते प्रसन्नपणे हसले व म्हणाले, अरे माझा डाॅक्टर मला तेच सांगत होता की कशिोर तुझ्याकडून सगळं बरोबर करून घेईल.

करिअरची सुरुवातीची वर्षे आरोग्याच्या बदल्यात पैसे कमावण्यात जातात आणि नंतर आरोग्य मिळवणि्याचा प्रयत्न केला जातो. आरोग्यासाठी आजचा िदवस महत्त्वाचा. उद्यापासून काहीतरी करू, असे म्हणणारे आजचा िदवस वाया घालवतात, हे नक्की. संपत्ती आणि आरोग्य हातात हात घालून जायला हवे आहे. यातही आरोग्याला महत्त्व द्यायला हवे. कारण ठणठणीत असाल तर आवश्यक संपती िमळणारच.

(लेखक न्यूट्रीशिअनिस्ट आणि डाएटशििनिस्ट आहेत.kishorerahatkar@gmail.com)