Home | Magazine | Madhurima | kitchen-gadgets-anurag

स्वयंपाकघरातील अस्त्र-सुरी

अनुराग गोडबोले | Update - Jun 04, 2011, 12:23 PM IST

घरातली विविध उपकरणं कोणती, ती कशी वापरायची, त्यांची काळजी कशी घ्यायची, हे कळावं म्हणूनच खास तुमच्यासाठी.... किचन गॅजेट्स

 • kitchen-gadgets-anurag

  टेस्टी टेक अवे
  संपूर्ण तयारी म्हणजे अर्धी लढाई जिंकणं, असं म्हणतात. रोज सकाळी स्वयंपाकघरात चहा-डबा-न्याहारी-जेवण, चहा- नाश्ता-जेवण ही टप्प्याटप्प्यातली लढाई आपल्यापैकी बहुतेकींच्या नशिबी असतेच. या लढाईवर निघण्याआधी आपल्याला ब:याच प्रकारे तयारी करणं शक्य असतं. रात्री भाजी चिरून ठेवणं, पोळ्यांसाठी कणीक भिजवून ठेवणं अशी तयारी सगळ्याच जणी करतो. स्वयंपाकघरातल्या या लढाईत कोणती अस्त्रं, म्हणजे उपकरणी आपल्याला वापरता येतील त्याची आपण माहिती करून घेऊ.
  फ्रेंच किंवा शेफ्स नाइफ : या सुरीचं पातं मुठीशी रुंद आणि टोकाशी निमुळतं असतं. 10 ते 12 इंच लांबीची ही सुरी भाज्या चिरण्यासाठी वापरतात. गोल चकत्या करण्यासाठी वा चौकोनी तुकडे वा खिमा करण्यासाठी ही नाइफ उत्तम.
  स्लाइसर : या सुरीचं पातं 14 इंच लांब आणि लवचिक असतं. शिजलेल्या मटनाचे तुकडे करण्यासाठी वा काही भाग कोरून काढण्यासाठी ही सुरी वापरतात.
  बुचर नाइफ : ही सुरी जड, रुंद आणि टोकाशी वळणदार असते. कच्चं मटन कापण्यासाठी वा त्यातील चरबी बाजूला काढण्यासाठी बुचर नाइफ वापरावी.
  बोनिंग नाइफ : ही सुरी 6 इंच लांब, पातळ आणि टोकदार असते. चिकन वा मटनातील हाडं काढण्यासाठी, म्हणजेच ते बोनलेस करण्यासाठी, ही सुरी वापरावी.
  पेअरिंग नाइफ : ही सुरी एकदम छोटी, जेमतेम दोन ते अडीच इंच लांब आणि टोकदार असते. छोट्या भाज्या चिरण्यासाठी वा प्रवासात नेण्यासाठी ही उत्तम. भाज्या व फळांची सजावट करण्या-साठीही पेअरिंग नाइफ वापरतात.
  क्लीवर चॉपर : चॉपर म्हणजेच खाटकाचा सुरा. हा खूप रुंद असतो, कारण त्याचा उपयोग हाडासकट मटन कापण्यासाठी करतात.
  बे्रड नाइफ : या सुरीचं पातं लांब आणि पातळ, पण खालून दातेरी असतं. बे्रड किंवा केकच्या चकत्या करण्यासाठी ही सुरी वापरतात.
  पॅलेट नाइफ : या सुरीचं पातं पातळ, लवचिक असतं, पण त्याला धार नसते. ब्रेडवर लोणी लावण्यासाठी, केकवर क्रीमचा थर पसरण्यासाठी ही सुरी वापरतात.
  सुरीला नेहमी व्यवास्थित धार असावी. सुरी वापरल्यानंतर स्वच्छ धुऊन पुसून ठेवावी. सुरीने चिरताना भाजी वा फळं स्टीलच्या ताटलीत व थेट ओट्यावर ठेवू नयेत. त्याने ताटलीवर वा ओट्यावर चरे पडतातच, पण सुरीची धारही कमी होते. त्यामुळे हल्ली सर्रास मिळणारे प्लास्टिक वा फायबरचे चॉपिंग बोर्ड वापरावे. मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ कापण्यासाठी वेगवेगळी सुरी वापरावी.

Trending