आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laughing Therapy: Power Of Disease Free By Swanand Deo

हास्य थेरपी: रोगमुक्त होण्याची शक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हसण्यात रोग बरा करण्याची शक्ती आहे. चिंता करणे, झोप न येणे, नकारात्मक विचार करणे. यामुळे आपले आरोग्य खराब होत आहे. या सर्व समस्या घालवण्यासाठी एक फुकट औषध आहे. तुम्ही ते औषध कधीही घेऊ शकता त्याचे काही नकारात्मक परिणामही नाहीत. त्या औषधाचे नाव आहे हास्य.

दिवसातून तुम्ही किती वेळा हसता याचा विचार करा. अभ्यास असे सांगतो की चार वर्षांचा मुलगा दिवसातून ४०० वेळा हसतो आणि प्रौढ माणूस दिवसातून फक्त चौदा वेळा हसतो. हे काय चालू आहे?
अभ्यास असे सांगतो की हसणा-या लोकांना जास्त मित्र असतात. हसणा-या लोकात जास्त आत्मविश्वास असतो. हसणारे लोक समोरच्या व्यक्तीवर जास्त प्रभाव टाकतात. ब्रिटिश हेल्थ फाउंडेशनचा प्रबंध असे सांगतो की, दोन हजार चाॅकलेट खाऊन मेंदूलाही उत्साहाची चालना मिळते. ती फक्त एका हास्यामुळे मिळते. हास्य तुमच्यातील आणि आजूबाजूच्या लोकांचा आनंद वाढवतो.
हसण्यामुळे आपली पचन संस्था चांगली राहते. त्यामुळे आपले आरोग्य उत्तम व निरोगी राहते. हास्य थेरपीमुळे डायबेटीस, हृदयाचे रोग, लखवा, अशा प्रकारचे अनेक रोग बरे होतात. हसण्यामुळे आपल्या मेंदूला विश्रांती मिळते. नैराश्यही कमी होते. शरीरातील कोलेस्टेरॉलची मात्र कमी होते आणि हसण्यामुळे आपला उत्साहही वाढतो. आपल्या चेह-याचे एकूण चौरेचाळीस स्नायूपैकी चेह-याचे चौदा स्नायू काम करतात.जे स्नायू आपण जास्त वापरतो. ते जास्त मजबूत होतात. हसण्यामुळे आपल्या हृदयाच्या फासळ्या ताणल्या जातात. छातीला आराम मिळतो आणि श्वास घेणेही सोपे होते.
खरे हसणे डोळ्यातून चालू होते व ते ओठांपर्यंत येते. खोटे हसणे हे फक्त ओठांच्या हालचाली असतात. ओठ आणि डोळे हे आपल्याला जन्मजात मिळाले आहेत. त्याचा उपयोग आपण हसण्यासाठी केल्यास आपणास व आपल्या समोरच्या व्यक्तीत आनंद निर्माण होतो.

तर निरोगी, आनंदी राहण्यासाठी आजपासूनच जास्त हसा!
आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी हास्य एक उपाय आहे. त्याचबरोबर खालील उपाय करा. आपल्या जीवनात आनंद निर्माण करा. आपण आपल्या आवडत्या गोष्टी केल्यास आपण आनंदित होतो. म्हणून आपल्या आवडत्या गोष्टीची एक यादी तयार करा. त्या गोष्टी करण्यासाठी रोज थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करा. यादीमुळे आपल्या लक्षात येईल की, आपण आपल्या आनंदासाठी रोज काय करतो. आपण ठरवलेल्या आनंदाच्या यादीप्रमाणे आपण दिवसभरात काय काम केले ते रात्री झोपण्यापूर्वी तपासा.