Home | Magazine | Kimaya | learn internet browsing

इंटरनेट ब्राउजिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा

दिव्य मराठी प्रतिनिधी | Update - Jul 06, 2012, 10:36 PM IST

ऑनलाइन असताना आपण अनेक साइट्स सर्च करत असतो. पण काही खासगी साइट्स आपण हाताळतो तेव्हा दक्षता घेतली गेलीच पाहिजे.

 • learn internet browsing

  ऑनलाइन असताना आपण अनेक साइट्स सर्च करत असतो. पण काही खासगी साइट्स आपण हाताळतो तेव्हा दक्षता घेतली गेलीच पाहिजे. उदा. इंटरनेट बँकिंग किंवा आपण मेल उघडतो तेव्हा इंटरनेटमध्ये असलेले व्हायरस तसेच हॅकर्सचे हल्ले वाढत चालले आहेत. अशा प्रकारे खासगी ब्राउजिंग करताना आपणास काही गोष्टी लक्षात घेणे जरूरी आहे.
  प्रायव्हेट मोड
  जेव्हा तुम्हाला प्रायव्हेट ब्राउजिंग करायची असते, तेव्हा ब्राउजरला प्रायव्हेट ब्राऊजिंग मोडमध्ये ऑन करा. यामुळे ब्राऊजर तुमच्याद्वारे उघडलेली कोणतीही साइट रेकॉर्ड करणार नाही किंवा डाटा सेव्ह करणार नाही. इतकेच नव्हे तर तुम्ही कोणताही कंटेंट डाऊनलोड करत असाल तर त्यासंबंधीची कोणतीही माहिती ब्राउजरमध्ये सेव्ह होणार नाही. जेणेकरून अन्य व्यक्ती त्या माहितीचा गैरवापर करणार नाही.
  ट्रॅक करू शकणार नाही
  प्रायव्हेट ब्राउजिंगमध्ये कोणताही शेअरिंग टूल अ‍ॅक्टिव्हेट नसतो. त्यामुळे माहिती बाहेर फुटूच शकत नाही. याचबरोबर साइट्समध्ये येणाºया जाहिरातीसुद्धा ब्लॉक करता येतात.
  आयपी मास्किंग
  सर्फिंग करताना तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कुकीज तर सेव्ह होतील. पण त्यांचे आयपी अ‍ॅड्रेस सेव्ह होत नाहीत. ज्यामुळे कोणतीही व्यक्ती त्या कुकीजद्वारा उघडल्या गेलेल्या साइट्स पाहू शकणार नाही.

Trending