आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी हॅप्पी बी फिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नमस्कार मैत्रिणींनो,
अतिथी संपादक या भूमिकेतून तुमच्याशी संवाद साधताना मला खरोखरच आनंद होत आहे. मी फिटनेस क्लबच्या माध्यमातून गेली जवळपास वीस वर्षे फिटनेस आणि वेलनेस व्यवसायात आहे. त्या वेळी मुंबईसारख्या शहरातसुद्धा हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्याच जिम्स होत्या. या जिममध्ये सकाळी ६ ते १० ही वेळ पुरुषांसाठी असे, तर सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळात स्त्रिया आल्याच तर व्यायामाला येत असत. मुळातच सायकल चालवणे, धावणे, फिरायला जाणे यामध्ये मला जबरदस्त आवड होती.
माझी ही आवड आईने ओळखली होती व म्हणून तिच्या आग्रहाने होम सायन्समध्ये पदवी घेऊन आहारतज्ज्ञ झाले. त्यानंतर फूड सायन्स आणि न्यूट्रिशनमध्ये एमएस्सी केलं. त्याच काळात एरोबिक्स, लिओटार्ड या नवीन प्रकारांची मला ओळख झाली. विठ्ठल कामत यांच्या ‘कामत क्लब’मध्ये मी हे नवीन प्रकार शिकवण्यास सुरुवात केली. याच अनुभवाच्या जोरावर १९९४मध्ये ‘एलएम-दी फिटनेस अॅकॅडमी’ची स्थापना केली. प्रशिक्षित ट्रेनर्स तयार करण्यासाठी डॉक्टर्स, आहारतज्ज्ञ, स्पोर्ट्स मेडिसिन प्रोफेशनल्स यांचा चमू असायचा.
आमच्या अॅकॅडमीमधून ऋजुता दिवेकर, प्रशांत सावंत यांसारखे २० हजारांहून अधिक पर्सनल ट्रेनर्स तयार झाले आहेत. त्या काळात ‘पर्सनल ट्रेनर’ म्हणून काम करणारी मी एकमेव स्त्री असेन. माझी पहिली क्लायंट माधुरी दीक्षित होती. आज कॅटरिना कैफ, शमिता शेट्टी, समीरा रेड्डी यांसारख्या आघाडीच्या मॉडेल्स व अभिनेत्री क्लायंट्स आहेत.

गेली सात वर्षे ‘लीना मोगरे फिटनेस’तर्फे पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये मी आज पाय रोवून उभी आहे. मुंबईत, बांद्रा आणि शिवाजी पार्क येथे अत्याधुनिक सुविधा असलेली फिटनेस सेंटर्स चालवतानाच माझ्यातील ऊर्जा इतरांनाही प्रोत्साहित करत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच व्यवसाय किंवा नोकरी करत आजच्या स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य राखण्याच्या काही उपयुक्त टिप्स मी पुढच्या भेटीत सांगेन. तोपर्यंत बी हॅपी... बी फिट...
leenamogre@yahoo.co.in