आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमी खर्चात उत्तम आरोग्य! (राइस ब्रॅन ऑइल)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

* आरोग्यदायी, कॅलरी कमी, तेल 20 टक्के कमी शोषले जाते :
भाताच्या कोंड्याचे तेल (राइस ब्रॅन ऑइल किंवा आरबीओ) अधिक आरोग्यदायी आणि परवडणारे असते. हे तेल कमी शोषले जाते (अन्य तेलांच्या तुलनेत जवळजवळ 20 टक्के कमी) आणि या तेलात शिजवलेल्या अन्नात कॅलरी कमी असतात. तेलाच्या व्हिस्कोसिटीमुळे तेल शोषले जाण्याचे प्रमाण कमी असते. भाताच्या कोंड्याच्या तेलाला मंद वास असतो, दुर्गंधी येत नाही आणि ते चिकट नसते. या तेलाचा वापर तळणासाठी, भाजण्यासाठी, परतण्यासाठी किंवा सलाड ड्रेसिंगसाठी केला तरी खाल्ल्यावर तेलाची चव तोंडात अजिबात राहत नाही.
* संतुलित प्रमाणात फॅटी अ‍ॅसिड कम्पोझिशन :
अन्य तेलांच्या तुलनेत या तेलात संतुलित प्रमाणात फॅटी अ‍ॅसिड कम्पोझिशन असते आणि शिफारस केलेल्या फॅटच्या प्रमाणाच्या जवळपास फॅट असलेले हे एकमेव तेल आहे. भाताच्या कोंड्याच्या तेलातील सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडचे गुणोत्तर डब्ल्यूएचओने केलेल्या शिफारशीच्या जवळपास आहे. या तेलात विविध प्रकारची आवश्यक फिटोकेमिकल्स आहेत, जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन ईसारखी अँटिऑक्सिडंटही असतात, जी फ्री रॅडिकल्ससोबत लढतात आणि म्हातारपण येण्याची प्रक्रिया मंदावतात. या तेलातील पोषण मूल्यांमुळे अन्य अनेक व्हेजिटेबल तेलांचा मेळ भाताच्या कोंड्याच्या तेलासोबत घातला जातो.
* कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी :
भाताच्या कोंड्याच्या तेलात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते, तसेच ते हृदय व धमन्यांचे रक्षण करते. याचे श्रेय गॅमा ओरिझेनॉल या घटकाला द्यायला हवे. हा घटक अन्य कोणत्याही व्हेजिटेबल ऑइलमध्ये आढळत नाही. हे तेल गुड कोलेस्टेरॉलवर (एचडीएल) कोणताही विपरीत परिणाम न करता बॅड कोलेस्टेरॉलचे (एलडीएल) प्रमाण कमी करते. जपानमधील नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेविंगने नमूद केले आहे की, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि अधिक शुगर असलेल्यांसाठी राइस ब्रॅन ऑइल फायदेशीर ठरत असल्याचे दिसते. टाइट-2 मधुमेहामध्ये राइस ब्रॅन ऑइल फायद्याचे ठरत असल्याचे तैवानमधील एका अभ्यासातही स्पष्ट करण्यात आले आहे.
* केमिकली नको, फिजिकली रिफाइंड राइस ब्रॅन ऑइल खरेदी करा :
तेल खरेदी करत असताना केमिकली रिफाइंड तेल न घेता, फिजिकली रिफाइंड राइस ब्रॅन ऑइल खरेदी करा. याचे कारण म्हणजे, फिजिकली रिफाइंड राइस ब्रॅन ऑइलमध्ये आवश्यक व्हिटॅमिन, पोषणमूल्ये व नैसर्गिक अँटि-ऑक्सिडंट अधिक प्रमाणात असतात. तेअधिक काळ टिकत असल्याने अधिक कालावधीसाठी साठवून ठेवता येते.
* तेलावर प्रक्रिया कराव्या लागत नाहीत, साठवताही येते :
भाताच्या कोंड्याच्या तेलावर विशेष प्रक्रिया कराव्या लागत नाहीत आणि ते अन्य कोणत्याही तेलासारखे साठवता येते. कुकिंग ऑइल साठवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, प्रकाश व हवेशी त्याचा संबंध येऊ नये म्हणून ते गडद रंगाच्या बाटलीत ठेवणे किंवा एअर टाइट लिड्स झाकणाच्या स्टील कंटेनरमध्ये ठेवणे. भाताच्या कोंड्याच्या तेलामुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे पोषणमूल्यांच्या गरजांसाठी शास्त्रीय पर्याय म्हणून आरबीओ पात्र ठरते. आरबीओमुळे उत्तम चव आणि पोषणमूल्य यांचा मेळ घातला जातो.
* मधुमेहाविषयी ठळक माहिती :
1. जगभरातील 34. ७ कोटी लोकांना मधुमेह झाला आहे. 2. सन 2004 मध्ये, रक्तातील उच्च प्रमाणातील साखरेचा फटका बसून अंदाजे 34 लाख जणांचा मृत्यू झाला. 3. कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत मधुमेहामुळे ८0 टक्क्यांहून अधिक मृत्यू होतात. 4. डब्ल्यूएचओ च्या मते, 200८ व 2030 या दरम्यान मधुमेहामुळे होणारे मृत्यू दोन तृतीयांश वाढतील. 5. निरोगी आहार, नियमित शारीरिक हालचाली, सर्वसाधारण शारीरिक वजन राखणे आणि तंबाखूचे सेवन टाळणे यामुळे टाइप-2 मधुमेह टाळता येऊ शकतो किंवा लांबवता येऊ शकतो.
(लेखिका मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या डॉ. बी. एम. नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्स येथील फूड सायन्स अँड न्यूट्रिशन या विषयातील असोसिएट प्रोफेसर आहेत.)