Home »Magazine »Divya Education» Lets Mathmathics Make Easy

गणित सोपं करूया

प्रा. प्रशांत गुल्हान | Feb 20, 2013, 01:00 AM IST

  • गणित सोपं करूया


आपल्या राज्यात स्वायत्त महाविद्यालये वगळता एमएसबीटीईद्वारा पॉलिटेक्निकची परीक्षा घेतली जाते. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा पॉलिटेक्निकची परीक्षा नियमित तारखेपूर्वी होणार आहे. ज्यांचे निकाल जानेवारीत आले आहेत त्यांची एप्रिलमधील परीक्षेत तारांबळ उडणार हे नक्की. खास करून रेग्युलरच्या विद्यार्थ्यांची, ज्यांना ‘बॅकलॉग’चे सुद्धा पेपर द्यावयाचे आहेत. या विषयांना पॉलिटेक्निकच्या भाषेत ‘गोल्डन सब्जेक्ट’ म्हणतात. म्हणजे ‘इकडे आड तिकडे विहीर’. गेल्या वर्षीचे सर्व विषय मुलांना ‘क्लिअर’ करावे लागतील तसेच चालू वर्षाचे 4 ते 5 विषय काढावे लागतील. कॉलेज सांभाळून ट्यूशन्ससुद्धा सांभाळाव्या लागतील. कारण ‘बॅकलॉग’ चे विषय कॉलेजमध्ये होणार नाहीत. त्यातल्या त्यात गणित असेल तर विद्यार्थ्यांना दडपण आल्यासारखे होते. बहुतांश विद्यार्थ्यांचा गणिताच्या नावाने थरकाप उडतो. यात दोष बिचा-या गणिताचा नाही तर हा विषय शिकवणा-या शिक्षकांचा व शिकणा-या विद्यार्थ्यांचा आहे.

बरेच पालक व विद्यार्थी ‘रिझल्ट’ लागल्यानंतर चिंतातुर अवस्थेत येतात. म्हणतात, पेपर तर पूर्ण लिहिला होता तरी मार्क्स कमी कसे पडलेत, फेलच कसा झालो?

आम्ही विद्यार्थ्यांची गणिताची एक चाचणी घेतो.
उदा. 1) -6-7 = ? , 2) -7 Ÿ-5=?, 3) -9 Ÿ 5 = ? 4) -7+4=?, 5) (-3)/2 - 5/2 =?, 6) (-6)/5 Ÿ3 =?, 7) 5/7 -6 =?, 8) (-7)/2 Ÿ 9/5 =? , 9) (5/3)/9 =?, 10) 9/(5/3) =?
थोड्याच वेळात निकाल समोर येतो. निकाल फारच धक्कादायक असतो. 90% विद्यार्थी या चाचणीत नापास झालेले असतात. पालक व विद्यार्थी अशा चाचणीत कसे नापास होऊ शकतात याची कारणे लक्षात येतात.
पॉलिटेक्निकमध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये मॅथ्स-1, दुस-या सेमिस्टर मध्ये मॅथ्स-2, तिस-या सेमिस्टरमध्ये मॅथ्स-3 असतो. प्रथम विचार करूया मॅथ्स-1 बद्दल. नव्या ‘जी-स्किम’नुसार जुन्या ‘ई-स्किम’च्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ट्रिग्नॉमेट्रीवर अधिक भर देण्यात आला आहे, तर को-ऑर्डिनेट जिऑ मेट्रीचे प्रश्न कमी करण्यात आले आहेत. तसेच स्टॅटिटिक्सचा समावेश करण्यात आला आहे. पुढच्या दोन पेपरचा विचार केल्यास ट्रिग्नॉमेट्री हे सर्वात महत्त्वाचे प्रकरण आहे. कारण मॅथ्स-2चे डेरिव्हेटिव्ह व मॅथ्स-3चे इंटिग्रेशन हे ट्रिग्नॉमेट्रीवर आधारित आहेत. ट्रिग्नॉमेट्रीसाठी फंडामेंटल आयडेंटिज, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो, निगेटिव्ह अँगल्स, अलाइड अँगल्स, कम्पाउंड अँगल, ट्रिपल अँगल, फॅक्टोरायझेशन, डिफॅक्टोरायझेशन फॉर्म्युला लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट रोज नजरेखाली घालावा लागेल. तसेच शिक्षकांना लेक्चर आधी रोज 10 मिनिटे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले विद्यार्थ्यांना विचारावे लागतील. दोन प्रॉब्लेम्स शिक्षकांनी सोडवून दिले असल्यास एक प्रॉब्लेम विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्यावा लागेल. शेवटी मेहनतीला पर्याय नाही.

बरेच विद्यार्थी मॅथ्ससाठी ‘टेक्स्ट मॅक्स’ वापरतात. माझ्या मते सोबतच ‘निराली’चे पुस्तक वापरावे कारण त्यात अनेक गणितांचे प्रश्न आहेत. त्यामुळे सराव चांगला होऊ शकतो. शिक्षकांनी नियमित टेस्टवर भर द्यावा.कारण,त्यामुळे विद्यार्थ्यांना छोट्या-छोट्या चुका लक्षात येतील.

‘ई-स्किम’च्या विद्यार्थ्यांना जुन्या पॅटर्ननुसार पेपर द्यावा लागणार आहे. त्यांच्यासाठी ट्रिग्नॉमेट्रीवर को-ऑर्डिनेट जिऑमेट्री हा उत्तम पर्याय आहे. त्यातही स्ट्रेट लाइन या धड्यावर विशेष लक्ष द्यावे. को-ऑर्डिनेटवर 30 ते 35 गुणांचे प्रश्न विचारले जातात. ई-स्किमच्या विद्यार्थ्यांनी पार्शल फ्रॅक्शन, डिटरमिनंट, मॅट्रिक्स, को-ऑर्डिनेट जिऑमेट्री व व्हेक्टरवर विशेष जोर द्यावा. ‘जी-स्किम’च्या विद्यार्थ्यांना ट्रिग्नॉमेट्रीवर थोडी मेहनत घ्यावी लागेल. तसेच स्टॅटिटिक्स ( मेजर्स ऑफ डिस्प्रेशन)चे फॉर्म्युले, चार्टच्या रूपात लक्षात ठेवल्यास गोंधळ होणार नाही. वरीलप्रमाणे अभ्यासक्रमाचा विचार केल्यास परीक्षा फारशी कठीण नाही.

prgulhan@indiatimes.com

Next Article

Recommended