आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेस....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुझे स्वागत करण्यासाठी
गुलाबपाकळ्या पसरल्या
मी तुझ्या वाटेवरती
तू अशी गोड लाघवी
तू नच सून आमची
तू तर आमची मुलगी

तुझे ते फ्लुएंट इंग्लिश बोलणे
सफाईदारपणे ती कार चालवणे
कोट-टाय घालून ऑफिसला जाणे
सहज लॅपटॉप, मोबाइल, कॉम्प्युटर हाताळणे
त्वरित कॉन्फिडंटली निर्णय ते घेणे
तू तर एक कर्तव्यदक्ष अधिकारी
मानतेस आम्हास आई-बाबा
आजवर केलेत खूप कष्ट
आता घ्यायचा पूर्ण आराम
असे सतत आम्हास सांगत
घेऊन जातेस दूर टूरवर
शॉपिंग, सिनेमा नि नाटकाला

ब्यूटीपार्लरला जाताना
‘आई तुमचीही घेतलीय अपॉइंटमेंट’
घेऊन जातेस मलाही तुझ्याबरोबर
सास-यांचीही घेतेस काळजी जशी लेक
बाबांनाही घेऊन जातेय मंथली चेकअपला
औषध, डाएट सारे करून घेतेस नियोजित

मुलांसाठीही वेळ देतेस कटाक्षाने
अभ्यास अ‍ॅक्टिव्हिटीसाठी करतेस धडपड
पालक सभेत विषय मांडतेस मोलाचे
लिहितेस पेपरमध्ये बालक-पालक लेखन
सारे काही सहज करतेस
अगदी मनापासून
करिअर तुझे बरोबरीचे तुझ्या पतीच्या
तू जाणवू देत नाहीस कधीच वरचढपणा
साथ देतेस अशी सहचराला ती
जणू सुकाणू तू; जहाजावरती
नम्रपणा नेमका तुझ्यातला असा
सा-यांनाच देतेस तू आपलेपणा

आम्हीही करीत होतो काहीतरी
पण तुझ्यासारखं असं असणं
परिपूर्ण महत्त्वाकांक्षेने ते जगणं
नाही आम्हाला कधी ते जमलं
माझ्याच स्वप्नांची केलीस तू पूर्तता
दृष्ट न लागो माझी तुजला

उभी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे
ध्येयाचे उच्चांक टोक ते गाठावे
व्यक्तिमत्त्व तुझे असे बहरावे
की सांगेन मी अभिमानाने
ही नच सून आमची
ही तर आमची मुलगी